उस्मानाबाद,दि.28:-शास्त्रीय
कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या
विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरिता निवड करण्यात आलेल्या संस्थाच्या
यादीमध्ये आणखी पाच संस्थाचा समावेश करण्यात आलेला आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
परीक्षामध्ये (इ.10) मार्च 2017 पासून वाढीव गुणाची सवलत देण्यासाठी शास्त्रीय,संगीत,नृत्य
व वादन तसेच लोककला क्षेत्रातील संस्थांची प्रमाणपत्र देण्यासाठी निवड करण्यात आली
होती.
इयत्ता
11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी शासन मान्य असणाऱ्या पाच संस्थांमधील विद्यार्थ्यांना
कला क्षेत्रातील राखीव जागावर सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येत
होता. त्या पुढील पाच संस्थांचा शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व
लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरीता
निवड करण्यात आलेल्या संस्थांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येत आहे.अखिल भारतीय
गांधर्व महाविद्यालय,सरफोजीराजे भोसले डान्स रिसर्च इन्स्टिट्यूट, नालंदा नृत्य
कला महाविद्यालय, श्री.वल्लभ संगीतालय,पुणे भारत गायन समाज आदी संस्थांचा समावेश
करण्यात आला असल्याचे, लातूर विभागीय सचिव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले
आहे