उस्मानाबाद
, दि.24:- सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार , शाहू , फुले, आंबेडकर पारितोषिक ,
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार सन 2017-18 या
वर्षाकरिता येणार आहेत.
तरी
याकरिता सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय काम
केलेल्या विविध संस्था/व्यक्तींनी आपले
प्रस्ताव दि. 30 एप्रिल 2017 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय ,
उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत .
तसेच
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या
02472-2223133 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा तसेच माहिती व अर्जाकरिता https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहावे , असे सहायक आयुक्त
श्री. एस.एस. मते यांनी कळविले आहे .
पात्रता– व्यक्ती
- सामाजिक क्षेत्रात म्हणजेच अनु.जाती /जमाती भटक्या व विमुक्त जातीचे कल्याणकारी कार्य, तसेच शारिरीक व मानसिकदृष्ट्या मनोदूर्बल, अपंग , कुष्ठरोगी इ. सामाजिक दूर्बल
घटकांच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत
समाजसेवक असावेत , सामाजिक कल्याण
क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत , पुरस्काराकरिता पुरुषाचे वय 50 वर्षे पूर्ण
असावे, महिलांचे वय 40 वर्षे पूर्ण असावे ,
कोणत्याही व्यक्तीस त्याच्या आयुष्यात एकपेक्षा
अधिकवेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही , समाज भूषण
पुरस्कार मिळण्यास जात , धर्म ,
लिंग , क्षेत्र याबाबीचा विचार केला जाणार
नाही , पुरस्कार मिळण्यास आमदार , खासदार
, जिल्हा परिषदेचे सदस्य किंवा कोणत्याही
पदाधिकारी पात्र असणार
नाहीत .
सामाजिक संस्था - सामाजिक
संस्था ही पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 वा सोसायटीज
रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार पंजीबध्द
असावी , संस्था राजकारणापासून अलिप्त असावी , तसेच कार्य व सेवा
ही पक्षातील व राजकारणापासून स्वतंत्र्य
अलिप्त असावीत , सामाजिक कल्याण क्षेत्रात
कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत , पुरस्काराकरिता पुरुषाचे वय 50 वर्षे पूर्ण असावे तर महिलांचे वय 40
वर्षे पूर्ण असावे .