उस्मानाबाद,दि.27:- जिल्हा परिषद व जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण
निधी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील रहिवाशी असलेल्या पदवीधर व पदवीच्या
अंतिम परीक्षेस बसलेल्या मुलींसाठी उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची
तिसरी बॅच दि. 1 मे 2017 ते दि.31 ऑक्टोबर 2017 या कालावधीत उमेद स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र, जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला,(मुलांची) उस्मानाबाद येथे
कार्यान्वयीत होत आहे, तरी या केंद्रात प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या मुलींनी प्रवेशाकरीता आवेदन पत्र विहित नमुन्यात दि. 29 एप्रिल
2017 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण निधी तथा मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते यांनी केले आहे.
या केंद्राची
तिसरी बॅच दि. 1 मे 2017 ते दि.31 ऑक्टोबर 2017 या कालावधी करीता जिल्हयातील
रहिवाशी असलेल्या मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व पदवीच्या अंतिम परीक्षेस बसलेल्या होतकरू व
अभ्यासू मुलींसाठी नव्याने सुरू करण्यात येत आहे. या केंद्राच्या प्रशिक्षणार्थी
मुलींची क्षमता दोनशे आहे. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या मुलीकरीता शंभर
जागा, शेतकरी तसेच शेतमजूर यांच्या मुलींकरीता 50 जागा व इतर विविध घटकातील
मुलींसाठी 50 जागा भरण्यात येणार आहेत.
हे
केंद्र दि.1 मे 2017 पासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वयीत राहील.
केंद्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींनी प्रवेशाकरीता आवेदन पत्र विहित नमुन्यात
दि. 29 एप्रिल 2017 तारखेपर्यंत सकाळी 10ते 5.30 या वेळेत सादर करून उमेद स्पर्धा
परिक्षा केंद्रात प्रवेश घेऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य
कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी केले आहे.