उस्मानाबाद, दि.24:- ९७ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन उस्मानाबाद
येथे आयोजित करून अभूतपूर्व सोहळ्यात यशस्वी केल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा मराठी
पत्रकार संघ व दैनिक पुण्य नगरी वृत्तपञ समूहाच्या वतीने स्वागताध्यक्ष तथा आमदार
सुजितसिंह ठाकूर यांचा हृदयसत्कार करण्यात आला़ .
उस्मानाबाद येथे ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा शानदार
सोहळ्याचा दि. 23 एप्रिल रोजी समारोप
झाला़ या सोहळ्यात संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा संयोजक आ.ठाकूर यांचा अभूतपूर्व
कार्यक्रमांनी संमेलन यशस्वी केल्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय
रणदिवे,सरचिटणीस संतोष जाधव, सहसचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे,
जिल्हा संघटक दिपक जाधव यांनी शाल, फेटा व बुके देवून सत्कार केला.
यावेळी सोहळ्याचे प्रमुख अतिथी तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,
समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा़.रविंद्र गायकवाड,नाट्य परिषदेचे
अध्यक्ष मोहन जोशी, कार्याध्यक्ष दिपक करंजीकर, संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर,
गंगाराम गवाणकर, आ. बसवराज पाटील,माजी आ. ज्ञानेश्वर पाटील,ओमराजे
निंबाळकर,नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर,उपनगराध्यक्ष सूरज साळुंके, दत्ताभाऊ
कुलकर्णी, अनिल खोचरे, नितीन काळे, ॲ नितीन भोसले, धनंजय शिंगाडे, विशाल शिंगाडे,
प्रशांत पाटील, आशिष मोदाणी आदी उपस्थित होते .
