उस्मानाबाद,दि.27:- जिल्हा रुग्णालयाच्या वतीने शनिवार दि.29
एप्रिल 2017 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, समुद्रवाणी येथे राजीव गांधी जीवनदायी
आरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये
बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सा, अस्थीरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, भीषकतज्ञ, कान,नाक,घसा
तज्ञ, आदी तज्ञ डॉक्टर मार्फत मोफत तपासणी
करण्यात येणार आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत रक्तदाब व
मधुमेह तपासणी केली जाणार आहे.तपासणीतून आवश्यकता भासल्यास रुग्णांना मोफत
शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी संदर्भित केले जाणार आहे.
तरी
या शिबिराचा पिवळे, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्ण शिधापत्रिकाधारक, शुभ्र
शीधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबातील रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी केले आहे.