उस्मानाबाद
दि.1:- राज्य शासनाने शासकीय रुग्णालयात रक्त,लघवी आणि तत्सम वैद्यकीय महागडया
चाचण्या मोफत करण्यासाठी एका कंपनी बरोबर
करार केला असून त्यामुळे अशा महागडया तपासण्या आता शासकीय रुग्णालयात विना मुल्य
केल्या जाणार आहेत.राज्यातील 33 जिल्हयात अशा प्रयोग शाळा सुरु करण्यात येणार असून
उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात ही प्रयोग शाळा सुरु करण्यात आली असून
राज्यातील 19 वी प्रयोगशाळा आहे.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न करुन ही योजना राज्यात कार्यान्वीत केली आहे.
कंपनी करारानुसार राज्यात विविध ठिकाणी प्रयोग शाळा (लॅब) स्थापन करणार आहे.या
प्रयोगशाळेतून त्यांच्याशी संलग्न असलेली शासकीय रुग्णालय,संस्थामधून रक्ताचे
नमुने संकलित करुन त्यांच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या विना शुल्क केल्या
जाणार आहेत.या चाचण्याचे तपासणी शुल्क या कंपनीला सरकार कडून मिळणार आहे.त्यामुळे
रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
राज्यातील
33जिल्हयात अशा प्रकारच्या 110 प्रयोग शाळा उभारण्यात येणार आहेत.उस्मानाबादचे
जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ.एकनाथ माले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही
प्रयोगशाळा उस्मानाबादसाठी मिळाली आहे. या
प्रयोगशाळेतून 24 तास अतिदक्षतेच्या वेळी सेवा दिली जाणार आहे.तपासणी अहवाल केवळ
तीन तासात रंग्णांना उपलब्ध करुन दिला जात आहे.हया प्रयोगशाळा राज्यातील सर्व
जिल्हयात टप्प्याटप्याने सुरू होणार आहेत.याप्रयोगशाळेसाठी जिल्हा समन्वयक
दत्तात्रय कोकाटे,प्रयोगशाळा वरिष्ठ तंत्रज्ञ दौलप्पा यंपाळे,रक्त संकलन तज्ञ
सचिन क्षीरसागर हे काम पाहत आहेत.
