उस्मानाबाद,दि.29:- मंगळवार दि.30 मे 2017 रोजी एक दिवसासाठी
जिल्हयातील औषध दुकानदारांच्या संघटनेचा देशव्यापी प्रस्तावित संप असल्याबाबत या
प्रशासनास ज्ञात झालेले आहे.सदर कालावधीत रुग्णाची गैरसोय होऊ नये व औषधाचा पुरवठा
सुरळीत व्हावा या हेतूने काही पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संघटनेस प्रशासनाकडून
कळविण्यात आले आहे, जेणेकरुन जनतेस औषध उपलब्ध होतील व होणारी गैरसोय टाळली जावू
शकेल.
यासाठी उस्मानाबाद जिल्हा
केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोशिएशन यांनी सदर बंद काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये
म्हणून तालुकानिहाय पुढीलप्रमाणे औषध दुकानांची नावे प्रशासनास कळविले
आहेत.उस्मानाबाद जाजू मेडीकल मो.9860800427, तुळजापूर भवानी मेडीकल मो.
9922716471,लोहारा गजानन मेडीकल मो.8308691011, वाशी महाराज मेडीकल
मो.992220017,कळंब न्यु गंभीरे मेडीकल मो.9921091222, परंडा सीना मेडीकल मो.9822996888,
भूम श्री.साई मेडीकल मेा.9765555242,उमरगा श्री.प्रेमनाथ मेडीकल मो.9730037593 हे
औषध दुकाने बंद कालावधीत सुरु राहणार आहेत.
वरीलपैकी बंद कालावधीत औषध दुकानदारांनी औषधाचा पुरवठा करण्यास नकार
दिल्यास त्याबाबत सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जुन्या अग्निशामक दलासमोर,
उस्मानाबाद(दूरध्वनी क्र.02472 222606) येथे संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक
आयुक्त अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांनी केले आहे.