उस्मानाबाद,दि.31:-
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापण
दिनानिमित्त दि. 2 ते 5 जानेवारी 2017 या दरम्यान जिल्हा पोलीस दलामार्फत विविध
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
पोलीस दिनानिमित्त दि.2 जानेवारी 2017 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हयातील सर्व
पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचे बॅनर व पत्रके प्रसिध्द करणे,
पोलीस मुख्यालय व जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा संदर्भात
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे रॅलीचे आयोजन व पथनाटय, रॅली नंतर महिला
स्व:रक्षणाविषयी प्रात्यक्षिकाचे आयोजन व
महिला सुरक्षेबाबतचे चर्चासत्र, दि.3 जानेवारी 2017 रोजी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याने शालेय
विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यास भेट आयोजीत करणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे व
त्यांना पोलीस विभागातर्फे वापरण्यात येणाऱ्या हत्याराविषयी माहिती देणे व
चर्चासत्र, निबंध, चित्रकला स्पर्धा आयोजित करणे, तर पोलीस अधिक्षक कार्यालयात
जनतेला सुरक्षा विषयक निरनिराळी माहिती देण्याकरीता सार्वजनिक ठिकाणी, चौरस्ता
येथे पोलीस बॅन्डचे संचलन करणे, दि.4
जानेवारी 2017 रोजी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याने शाळा, महाविद्यालय येथे
संबंधित पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन सामाजिक सुरक्षा, वाहतूक सुरक्षा, वाहतूकीचे
नियम व सुरक्षित वाहतूक याविषयी माहिती देणे, पोलीस मुख्यालयात कायदेशिररित्या
प्रक्रिया पूर्ण झालेल्या किंमती मुद्देमाल नियमानुसार फिर्यादीस परत करण्याची
विशेष मोहीम राबविणे, दि.5 जानेवारी 2017 रोजी पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस अधिक्षक
कार्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन व शस्त्रप्रदर्शन इत्यादी
कार्यक्रमाचे आयोजन पोलीस वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले असल्याचे पोलीस अधिक्षक
श्री. पंकज देशमुख यांनी कळविले आहे.
*****