उस्मानाबाद,दि.27:- येथील स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हा
कोषागार कार्यालयाकडून ई-पेमेंट व कॅशलेस व्यवहारासंबंधी जिल्ह्यातील सर्व शासकीय
कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले होते .
सुरुवातीस प्रास्ताविकात जिल्हा कोषागार अधिकारी श्री. विशाल
पवार यांनी उपस्थितांना पूर्वी होणाऱ्या शासकीय व्यवहार पध्दती व भविष्यात होणाऱ्या व्यवहार पध्दतींविषयी माहिती दिली.
या कार्यशाळेत ॲक्सिस
बॅंकेच्या सहकार्याने भविष्यातील शासकीय निधी हस्तांतरीत करण्यासाठी वापरण्यात
येणाऱ्या पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम आणि डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड,आर. टी. जी.
एस., नेट बॅकींग इत्यादी विषयी श्री. देवांग भाटीया , श्री. घाग आणि ॲक्सिस बॅंक
व्यवस्थापक श्री. किशोर पाटील
यांनी यू.पी.आय. अंतर्गत ॲक्सिस पे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व आहरण
व संवितरण अधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी
श्री. आप्पासाहेब पवार,श्री.एस.बी शिंदे, डी. ए. संकपाळ हे उपस्थित होते.
****
