उस्मानाबाद.दि.27:- नगर परिषद, उस्मानाबाद दीनदयाळ
अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील सामाजिक विकास व पायाभूत
सुविधा या उपांगांतर्गत महिला बचतगटातील सदस्यांच्या क्षमता वाढविण्यासाठी
त्यांच्या मासिक बैठकीत त्यांना शासनाच्या विविध योजनेची माहिती मिळावी, या दृष्टीने
लोकराज्य मासिकाचे प्रति महा अंक एकूण ११३ महिला बचतगटांची प्रति वर्ष रु.१००/-
प्रमाणे एकूण रु.११ हजार ३०० चा धनादेश उस्मानाबाद नगर अध्यक्ष श्री.मकरंद राजेनिंबाळकर
यांच्या हस्ते श्री.मनोज शिवाजी सानप जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे सुपूर्द
केला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.
सानप यांनी या बचतगटाच्या महिलांना
बचतगटांचा सामाजिक विकास होण्यात कसा हातभार लागू शकतो ,
"लोकराज्य" या मासिकाच्या
माध्यमातून बचतगटांना शासन नेमके काय काम
करते तसेच शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत याबद्दलची माहिती कशाप्रकारे
मिळू शकते , माहिती व जनसंपर्क विभाग व जिल्हा माहिती कार्यालय नेमके काय काम करते , विविध शासकीय
योजनांच्या माहितीकरिता शासनाच्या कोणकोणत्या वेबसाईटस उपलब्ध
आहेत,शासनाच्या विविध विभागांनी एकमेकांना पूरक व एकत्रित काम केल्यास जनतेला कशाप्रकारे लाभ होऊ शकतो, अशा विविध विषयांबाबत
सह उदाहरण मार्गदर्शन केले .
त्यावेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष श्री.सुधीर
आण्णा पाटील ,सदस्य श्री.राजाभाऊ पवार, श्री.बाळासाहेब काकडे, तुषार राजेनिंबाळकर,
श्री.रवी वाघमारे, मुख्याधिकारी श्री.बाबासाहेब मनोहरे, स्वामिनी वस्ती स्तर संघाच्या
अध्यक्षा सुरेखा भोजगुडे, सचिव मीना गायकवाड, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी
श्री.सोमनाथ लामगुंडे, श्री.धीरज इर्गट, श्री.अमोल खवले, श्रीमती वनमाला सावंत,
श्री.शेख युसुफ समुदाय, श्री.विक्रम समुद्रे, श्री.सतीश सांगळे, सामाजिक विकास व
पायाभूत सुविधेचे व्यवस्थापक श्री.महारुद्र गालट आदी उपस्थित होते.****


