Monday, 26 December 2016

जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते पाडोळी येथील तूर केंद्राचे उद्घाटन




    उस्मानाबाद,दि.26:- पाडोळी येथील जयलक्ष्मी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी यांच्यामार्फत तूर व हरभरा केंद्राचे उद्घघाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
         यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी, तहसिलदार सुजित नरहरे, कृषी उपसंचालक डी. व्ही. जाधवर,तालुका कृषी अधिकारी एन.जी. देशमुख, डॉ. कुलकर्णी  तसेच  कंपनी  चे  इतर  संचालक  व  सदस्य  उपस्थित होते.
        जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, शेतकऱ्यांनी  कृषी  गटाच्या  माध्यमातून काम केले पाहिजे  त्यामुळे  विकास निश्चित होईल त्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सर्वांनी  एकत्र  येवून  काम केले तर गावाचा‍  विकास होवून  एक  आदर्श  गाव  निर्माण  होईल.
        जयलक्ष्मी फार्मर्स या कंपनीची 2013 मध्ये स्थापना झाली त्यावेळी सुरूवातीस एकूण 250 सभासद होते. त्यामध्ये वाढ होवून आज 1 हजार 50 सभासद आहेत. पाडोळी, टाकळी, कनगरा, धुत्ता हे कंपनी कार्यक्षेत्रातील गावे असून आत्माअंतर्गत नोंदणी असणारे 47 शेतकरी गट कंपनीचे सहासद आहेत. कंपनीची स्वत:ची जमीन,गोडाऊन व सर्व यंत्रणा कार्यरत आहे. कंपनीतर्फे डेअरी चालविली जात असून शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात, त्याचबरोबर कंपनीकडून शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप केले जाते. कंपनीचे सभासद शेतकरी पॉलीहॉऊस मधील जरबेरा फुलांचे उत्पादन देखील घेतात. जलयुक्त शिवार अभियानात 1 लाख रुपये लोकवाटा भरून नदीचे खोलीकरण व रुंदीकरण कामात सहभाग नोंदवला. कंपनी  शासकीय हमी  भावाप्रमाणे  परिसरातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करते.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सतीष देडे यांनी केले तर आभार श्री.अमर गुंड यांनी मानले.