Monday, 26 December 2016

माध्यमिक शालांत परीक्षेची प्रिलिस्ट दुरूस्ती


 उस्मानाबाद,दि.26:-  माध्यमिक  शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2017 परीक्षेची  आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने स्वीकारून त्यामध्ये प्रिलिस्ट दुरूस्त्या करण्याकरीता दि.19 डिसेंबर 2016 पर्यंतची मुदत ठेवण्यात आली होती. परंतु सर्व्हरच्या अडचणीमुळे जर काही शाळांच्या दुरूस्त्या बाकी असल्यास त्या यादीच्या स्वरूपात अथवा ऑनलाईन प्रिलिस्ट/एक्सेल यादीवर दुरूस्त्या दर्शविलेल्या स्वरुपात मंडळास सादर करण्यात याव्यात, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे लातूर विभागीय सचिव यांनी कळविले आहे.
                                             ****