उस्मानाबाद,दि.27:- पशुसंवर्धन
विभागाच्या स्थापनेस 125 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे या विभागामार्फत जिल्हयातील
सर्व प्रजननक्षम गायी/म्हशीमध्ये मास कृत्रिम रेतन दि.26 डिसेंबर 2016 ते दि.26
जानेवारी 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पशुंची प्रजनन
क्षमता व उत्पादकता वाढीसाठी प्रात्याक्षिके व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचा समावेश
करण्यात आला आहे.
तरी शेतकरी, पशुपालकांनी
आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून कार्यक्रमात सहभाग नोंदवावा
असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
******