उस्मानाबाद.दि.30:- रयत
शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांसाठी दि.19 ते 25 जानेवारी 2017 या कालावधीत राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये दि.19 ते 21 जानेवारी दरम्यान
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा, दि.23 ते 25 जानेवारी 2017
या दरम्यान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन यशंवतराव
चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, सातारा येथे केले आहे.
या स्पर्धांसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख वक्तृत्व स्पर्धेसाठी
दि. 16 जानेवारी 2017 तर प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी दि 15 जानेवारी 2017 राहील.
स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (02162-231074) व संस्थेच्या www.rayatshikshan.edu व www.erayat.org या संकेत स्थळावर संपर्क साधावा.
असे कार्यकारी संचालक श्री. आर. के. शिंदे यांनी कळविले आहे.