Saturday, 3 June 2017

महागडी रक्त तपासणी ही होणार शासकीय रुग्णालयात मोफत


उस्मानाबाद दि.1:- राज्य शासनाने शासकीय रुग्णालयात रक्त,लघवी आणि तत्सम वैद्यकीय महागडया चाचण्या मोफत करण्यासाठी  एका कंपनी बरोबर करार केला असून त्यामुळे अशा महागडया तपासण्या आता शासकीय रुग्णालयात विना मुल्य केल्या जाणार आहेत.राज्यातील 33 जिल्हयात अशा प्रयोग शाळा सुरु करण्यात येणार असून उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात ही प्रयोग शाळा सुरु करण्यात आली असून राज्यातील 19 वी प्रयोगशाळा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न करुन ही योजना राज्यात कार्यान्वीत केली आहे. कंपनी करारानुसार राज्यात विविध ठिकाणी प्रयोग शाळा (लॅब) स्थापन करणार आहे.या प्रयोगशाळेतून त्यांच्याशी संलग्न असलेली शासकीय रुग्णालय,संस्थामधून रक्ताचे नमुने संकलित करुन त्यांच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या विना शुल्क केल्या जाणार आहेत.या चाचण्याचे तपासणी शुल्क या कंपनीला सरकार कडून मिळणार आहे.त्यामुळे रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.

राज्यातील 33जिल्हयात अशा प्रकारच्या 110 प्रयोग शाळा उभारण्यात येणार आहेत.उस्मानाबादचे जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ.एकनाथ माले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही प्रयोगशाळा उस्मानाबादसाठी मिळाली आहे.  या प्रयोगशाळेतून 24 तास अतिदक्षतेच्या वेळी सेवा दिली जाणार आहे.तपासणी अहवाल केवळ तीन तासात रंग्णांना उपलब्ध करुन दिला जात आहे.हया प्रयोगशाळा राज्यातील सर्व जिल्हयात टप्प्याटप्याने सुरू होणार आहेत.याप्रयोगशाळेसाठी जिल्हा समन्वयक दत्तात्रय कोकाटे,प्रयोगशाळा वरिष्ठ तंत्रज्ञ दौलप्पा यंपाळे,रक्त संकलन तज्ञ सचिन क्षीरसागर हे काम पाहत आहेत.

          

माता-बाल मृत्यूदर कमी करण्यामध्ये परिचारिकांचा सहभाग महत्वाचा -डॉ.वडगावे



उस्मानाबाद,दि.2:- व्यक्तीच्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत परिचारिकाही आरोग्य संदर्भात महत्वाची भूमिका बजावते,तसेच माता बाल मृत्यू कमी करण्यासाठी परिचारीकांचा सहभाग महत्वाचा आहे,असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे यांनी येथे केले.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने पहिल्या शासकीय नर्सेसची कार्यशाळा डॉ.वडगावे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी बोलत होते. माता बाल संगोपनातील अद्यावत माहिती  या विषयावर ही एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी  स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल वाघमारे, डॉ.सचिन देशमुख, डॉ.महेश कानडे,रुग्ण कल्याण समितीचे अब्दुल लतिफ शेख,सेवानिवृत्त अधिसेविका विमल पानसे, अधिसेविका श्रीमती सरस्वती थोरात आदीची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ.वडगावे म्हणाले की, परिचारकांना अद्यावत शिक्षण ही महत्वाचे असून परिचारकांनी अशा कार्यशाळेत सहभागी होऊन आपले ज्ञान अद्यावत करावे.

या कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या व निरीक्षक श्रीमती अश्विनी बेले यांनी कार्यशाळेच्या महत्वाच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


या कार्यशाळेस प्राचार्य अरुण कदम,श्रीमती गोरे,सुनिता पोखरकर, रवी बसरगी,अमोल गरड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती जयश्री हेंगडे व सरस्वती खटींग यांनी केले तर आभार शासकीय नर्सिग कॉलेजचे प्राचार्य सिद्रामप्पा कोरळी यांनी केले.या कार्यशाळेसाठी जिल्हयातील परिचारिका मोठया संख्येने उपस्थित होत्या. 

Monday, 29 May 2017

औषध दुकानाच्या बंद कालावधीत रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासन सज्ज


उस्मानाबाद,दि.29:-  मंगळवार दि.30 मे 2017 रोजी एक दिवसासाठी जिल्हयातील औषध दुकानदारांच्या संघटनेचा देशव्यापी प्रस्तावित संप असल्याबाबत या प्रशासनास ज्ञात झालेले आहे.सदर कालावधीत रुग्णाची गैरसोय होऊ नये व औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा या हेतूने काही पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संघटनेस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे, जेणेकरुन जनतेस औषध उपलब्ध होतील व होणारी गैरसोय टाळली जावू शकेल.

यासाठी उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोशिएशन यांनी सदर बंद काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुकानिहाय पुढीलप्रमाणे औषध दुकानांची नावे प्रशासनास कळविले आहेत.उस्मानाबाद जाजू मेडीकल मो.9860800427, तुळजापूर भवानी मेडीकल मो. 9922716471,लोहारा गजानन मेडीकल मो.8308691011, वाशी महाराज मेडीकल मो.992220017,कळंब न्यु गंभीरे मेडीकल मो.9921091222, परंडा सीना मेडीकल मो.9822996888, भूम श्री.साई मेडीकल मेा.9765555242,उमरगा श्री.प्रेमनाथ मेडीकल मो.9730037593 हे औषध दुकाने बंद कालावधीत सुरु राहणार आहेत.  वरीलपैकी बंद कालावधीत औषध दुकानदारांनी औषधाचा पुरवठा करण्यास नकार दिल्यास त्याबाबत सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जुन्या अग्निशामक दलासमोर, उस्मानाबाद(दूरध्वनी क्र.02472 222606) येथे संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांनी केले आहे.