Saturday, 20 May 2017

तालुका निहाय कार्यशाळेचे संपर्क अधिकारी नियुक्त


उस्मानाबाद, दि. 20:- बळीराजा चेतना अभियान अंतर्गत ग्रामस्तरीय समिती मार्फत निवडल्या जाणाऱ्या त्रस्त कुटुंबाच्या अनुषंगाने तालुकानिहाय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत.)उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
या कार्यशाळे मध्ये नरेगा,बळीराजा चेतना अभियान व शेतकरी कर्ज पुरवठा या वरील मुद्याच्या अनुषंगाने संबंधित खातेप्रमुख समन्वयाने आयोजन करणार आहेत.

तालुका निहाय कार्यशाळेच्या समन्वयासाठी देखरेख व कार्यशाळेच्या आयोजना नंतरचा सविस्तर फलनिष्पती अहवाल सादर करण्यासाठी तालुका निहाय कार्यशाळेचे संपर्क अधिकारी म्हणुन पुढील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.उस्मानाबाद तालुक्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास), तुळजापूर -उपजिल्हाधिकारी (रोहयो), उमरगा -उपजिल्हाधिकारी भूसंपादन (मध्यम प्रकल्प क्र.2), लोहारा-जिल्हा पुरवठा अधिकारी,भूम-उपजिल्हाधिकारी (सा.प्र.),परंडा- जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,कळंब-अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी (जि.प.),वाशी तालुक्यासाठी कृषी विकास अधिकारी आदी नेमणूक करण्यात आली आहे,असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. 

"दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस" जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा



उस्मानाबाद, दि. 20  :- "दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस" शनिवार दि.20 मे 2017 रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यातआला. यावेळी जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्ण गमे, अपर जिल्हाधिकारी श्री.अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,उपजिल्हाधिकारी (पुरवठा) अरविंद लाटकर आदीसह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सेवा हमी कायदयांतर्गत शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे - संस्थापक व मुख्य सल्लागार श्री.ग.दी.कुलथे



उस्मानाबाद,दि.20:- सेवा हमी कायदयांतर्गत शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, असे मत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केले.
            उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते.यावेळी श्री.कुलथे बोलत होते.यावेळी विभागीय सहसचिव रामचंद्र खंदारे,राज्य संघटक मधुकर डोईफोडे, डॉ.मधुकर गिरी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,प्रकल्प संचालक डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी तथा कार्याध्यक्ष  मनोज शिवाजी सानप, अप्पर कोषागार अधिकारी आप्पासाहेब पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना श्री.कुलथे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना अधिकारी महासंघाचा पूर्ण पाठिंबा राहील, संघटनाची एकजूट चांगली आहे,रिक्त पदे भरण्याबाबत संघटना सतत आग्रही आसून महासंघाच्या मागण्यांबाबत सतत पाठपुरावा चालू आसून मुख्यमंत्र्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या बैठकीत राज्यातील  कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, सेवा निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करावे त्याच प्रमाणे 5 दिवसाचा आठवडा, महिला संबंधित बालसंगोपन रजा या विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी ग.दि. कुलथे यांनी अधिकारी  महासंघाच्या मुंबईतील बांद्रा येथील कल्याण केंद्र इमारतीच्या उभारणी संदर्भात माहिती दिली व अधिकारी कल्याण केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी पाच हजार रुपये देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले. या बैठकीला जिल्हा आणि विभागीय राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी व  राजपत्रित अधिकारी उपस्थित होते.