उस्मानाबाद,दि.20:-
सेवा हमी कायदयांतर्गत शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, असे मत
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि.
कुलथे यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन मध्यवर्ती प्रशासकीय
इमारतीतील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते.यावेळी श्री.कुलथे बोलत
होते.यावेळी विभागीय सहसचिव रामचंद्र खंदारे,राज्य संघटक मधुकर डोईफोडे, डॉ.मधुकर
गिरी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,प्रकल्प संचालक डॉ.रुपाली
सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी तथा कार्याध्यक्ष मनोज शिवाजी सानप, अप्पर कोषागार अधिकारी
आप्पासाहेब पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना श्री.कुलथे
म्हणाले की, शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना अधिकारी महासंघाचा पूर्ण पाठिंबा
राहील, संघटनाची एकजूट चांगली आहे,रिक्त पदे भरण्याबाबत संघटना सतत आग्रही आसून
महासंघाच्या मागण्यांबाबत सतत पाठपुरावा चालू आसून मुख्यमंत्र्याकडून सकारात्मक
प्रतिसाद मिळत आहे. या बैठकीत राज्यातील
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, सेवा निवृत्तीचे वय 58
वरून 60 वर्ष करावे त्याच प्रमाणे 5 दिवसाचा आठवडा, महिला संबंधित बालसंगोपन रजा
या विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी ग.दि. कुलथे यांनी अधिकारी
महासंघाच्या मुंबईतील बांद्रा येथील कल्याण केंद्र इमारतीच्या उभारणी
संदर्भात माहिती दिली व अधिकारी कल्याण केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी पाच हजार
रुपये देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले. या बैठकीला जिल्हा आणि विभागीय
राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी व
राजपत्रित अधिकारी उपस्थित होते.