उस्मानाबाद, दि. 20 :- "दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस" शनिवार दि.20
मे 2017 रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा
करण्यातआला. यावेळी जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्ण गमे, अपर जिल्हाधिकारी
श्री.अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,उपजिल्हाधिकारी (पुरवठा)
अरविंद लाटकर आदीसह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.