Thursday, 18 May 2017

उन्नत शेती समृध्द शेतकरी सन 2017-18 योजनेंतर्गत ऑनलाईन केलेले ठिबक/तुषार अर्ज स्वीकारणे सुरु


उस्मानाबाद.दि.18:- उन्नत शेती समृध्द शेतकरी  योजनेंतर्गत सुक्ष्म सिंचन योजनेखाली सन 2017-18 मध्ये ठिबक/ तुषार संच घेणेसाठी ऑनलाईन नोंदणी चालू आहे. तरी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज प्रत, सातबारा, आठ अ, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, चतु:सीमा इत्यादी कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी, उस्मानाबाद कार्यालयात जमा करावी.
             ठिबक,तुषार संचाचे सन 2017-18 चे अनुदान प्राप्त होताच आपणास पूर्व संमती देण्यात येईल. पूर्वसंमती प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या मुदतीत ठिबक,तुषार मान्यता प्राप्त्‍ कंपनी, डिलर कडून खरेदी करून सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करावा.

            सादर केलेल्या प्रस्तावाची दहा दिवसात मोका तपासणी करुन अनुदानाची अदायगी करण्यात येईल.तरी ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांनी पूर्व संमतीसाठी अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री.ए.जी. देशमुख यांनी केले आहे.