Saturday, 20 May 2017

तालुका निहाय कार्यशाळेचे संपर्क अधिकारी नियुक्त


उस्मानाबाद, दि. 20:- बळीराजा चेतना अभियान अंतर्गत ग्रामस्तरीय समिती मार्फत निवडल्या जाणाऱ्या त्रस्त कुटुंबाच्या अनुषंगाने तालुकानिहाय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत.)उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
या कार्यशाळे मध्ये नरेगा,बळीराजा चेतना अभियान व शेतकरी कर्ज पुरवठा या वरील मुद्याच्या अनुषंगाने संबंधित खातेप्रमुख समन्वयाने आयोजन करणार आहेत.

तालुका निहाय कार्यशाळेच्या समन्वयासाठी देखरेख व कार्यशाळेच्या आयोजना नंतरचा सविस्तर फलनिष्पती अहवाल सादर करण्यासाठी तालुका निहाय कार्यशाळेचे संपर्क अधिकारी म्हणुन पुढील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.उस्मानाबाद तालुक्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास), तुळजापूर -उपजिल्हाधिकारी (रोहयो), उमरगा -उपजिल्हाधिकारी भूसंपादन (मध्यम प्रकल्प क्र.2), लोहारा-जिल्हा पुरवठा अधिकारी,भूम-उपजिल्हाधिकारी (सा.प्र.),परंडा- जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,कळंब-अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी (जि.प.),वाशी तालुक्यासाठी कृषी विकास अधिकारी आदी नेमणूक करण्यात आली आहे,असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.