उस्मानाबाद.दि.16:-
बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा
कार्यक्रम राबविणे बाबत महसूल गावातील ग्रामस्तरीय समितीस दिलेल्या वार्षिक रुपये
एक लाख रक्कमेच्या खर्चाबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्यानुसार
त्रस्त कुटुंबास पेरणी, बियाणे करीता, गरीब कुटुंबास आकस्मिक खर्चासाठी व 2-3
महिन्याकरिता बिनव्याजी कर्ज इत्यादीकरीता वैयक्तिक लाभ प्रदानाच्या बाबीसाठी
पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व महसूली गावांमधील लाभ प्रदान करण्यात
आलेल्या त्रस्त कुटुंबप्रमुखांच्या नावाची यादी पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर नागरिकांना
पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे,असे ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद
यांच्याकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.