उस्मानाबाद , दि.25:- पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा
योजनेंतर्गत आंबिया बहारासाठी द्राक्ष,
केळी , पेरु , मोसंबी, डाळींब या
फळपिकांचा विमा हप्ता भरण्यासाठी दि. 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात
आली आहे . त्यानुसार बँकांनी कर्जदार
शेतकऱ्यांची घोषणापत्रे विमा कंपनीस सादर करण्याची अंतिम तारीख दि.16 डिसेंबर 2016 व बँकांनी
बिगर कर्जदार शेतकऱ्यांची घोषणापत्रे
विमा कंपनीस सादर करण्याची अंतिम तारीख
दि. 5 डिसेंबर 2016 राहील .
दि. 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत द्राक्ष , केळी ,
मोसंबी, पेरु, डाळींब या पाच फळपिकांकरिता
हवामान धोक्याचा कालावधी
कायम ठेवून विमा हप्ता
भरण्यास मुदत वाढ देणेबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स व बजाज
अलायन्झ या योजनेत सहभागी असलेल्या विमा
कंपन्यांनी सहमती दर्शविली असल्याचे
जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे यांनी
कळविले आहे. Friday, 25 November 2016
बँकांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात – विजयालक्ष्मी बिद्री
उस्मानाबाद,दि.25:-
500 व 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी
आणि या पार्श्वभूमीवर चलन बदल निर्माण
झालेल्या परिस्थितीत बँकांनी ग्रामीण
भागातील जनतेसाठी विशेषत:
ज्या ग्रामीण भागात एटीएम मशिन्स
नाहीतच अशा ठिकाणी विशेष लक्ष देवून त्या भागातील
जनतेला जुने पैसे बदलणे किंवा
नव्या नोटांचा पुरवठा कसा होईल यावर विशेष उपाययोजना
कराव्यात , अशी सूचना केंद्र
शासनाच्या विशेष पथकाच्या सदस्या
विजयालक्ष्मी बिद्री यांनी काल येथे केली .
रुपये 500 व 1000 च्या
नोटाबंदीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि
प्रत्येक राज्याने, , जिल्ह्याने त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या
उपाययोजना त्याची फलश्रुती , सद्य:स्थितीत उद्भवलेल्या
नव्या अडचणी याबाबतचा आढावा
घेण्यासाठी केंद्र शासनाच्या
वतीने प्रादेशिक संचालक स्टाफ सिलेक्शन कमिशन, कर्नाटक श्रीमती
विजयालक्ष्मी बिद्री या उस्मानाबाद जिल्ह्यात
आल्या होत्या . त्यावेळी जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत
त्या बोलत होत्या .
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , जिल्हा
परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते
, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक , अप्पर
पोलीस अधीक्षक दिपाली घाटगे , निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव , उपजिल्हाधिकारी
प्रभोदय मुळे , शिल्पा करमरकर , जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे , जिल्हा माहिती अधिकारी मनोज
शिवाजी सानप , जिल्हा उपनिबंधक बी.ए.शिंदे
हे उपस्थित होते .
श्रीमती बिद्री म्हणाल्या, केंद्र शासनाने देशातील काळा
पैसा नष्ट व्हावा,अतिरेक्यांना पुरविली जाणारी आर्थिक रसद बंद पडावी, देशातील
प्रत्येक नागरिकाला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा याकारिता 500 व 1000
च्या नोटा बंद करुन नवे चलन सुरु केले.
सुरुवातीचे काही दिवस जनतेला, बँक
कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. मात्र शासनाने जनतेला कमीत कमी त्रास
व्हावा याकरिता सर्वतोपरी प्रयत्न
केले. यामध्ये बँकांची भूमिका निश्चितच महत्वपूर्ण राहिली आहे.
या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना सूचना देताना त्या पुढे
म्हणाल्या, बँकांनी ग्रामीण भागातील विशेषत: ज्या भागात एटीएम मशिन्स नाहीत त्या
भागात आवर्जून विशेष लक्ष द्यावे, लोकांना शासनाने ठरविल्याप्रमाणे पैसे मिळतील
त्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करावेत, बॅकांची खाते संख्या लक्षात घेवून लीड बँकेने
तथा मुख्य बँकांनी इतर बँकांना पैसे पुरवावेत.
पैसे बदलून घेण्यासाठी वा काढण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी असेल तिथे टोकन
नंबर देवून लोकांना वेळा ठरवून द्याव्यात. बँकेत पैसे बदलून घेण्यासाठी आलेल्या
ग्राहकांच्या बोटावर शाई किंवा
परमनंट मार्करने खूण करावी.
श्रीमती बिद्री यांनी लोकांनाही आवाहन केले आहे की,
त्यांचे जास्तीत जास्त व्यवहार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने करावेत, पेटीएम ची
सुविधा वापरावी , एटीएम मशिनचा जास्तीत जास्त वापर कारावा, रेशन दुकानदारानीही
त्यांचे व्यवहार ऑनलाईन करावेत. जनतेने व्यवहार करताना सावध असावे, आपलाच पैसा
बँकांमध्ये जमा करावा, दुसऱ्या व्यक्तीचे पैसे जमा करणे व बदलून मिळण्यासाठी जर
दिले तर ते घेवू नयेत. त्या पुढे इतर
विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना म्हणाल्या की, कृषी खात्याने जिल्हा ग्रामीण
बँकांशी समन्वय साधून शेतकरी कर्ज, शेतकरी
विमा यांना लक्ष घालावे. पिक विमा भरण्यासाठी
जुन्याच नोटा वापरण्याची
परवानगी मिळणेबाबत त्या वरिष्ठ पातळीवर बोलतील.प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी
मोटार सायकल, चारचाकी वाहने यांच्या खरेदीत वाढ झाली किंवा कसे याबाबत आढावा घेवून
जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल द्यावा .
बैठकीच्या
सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी चलनबदलाच्या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण
झालेली परिस्थिती आणि प्रशासन
व इतर यंत्रणांनी केलेल्या
जनतेला जास्तीत जास्त मदत होईल यासाठी केलेल्या उपाय योजना याबाबतचे
सविस्तर सादरीकरण केले.
शेवटी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी श्रीमती बिद्री
व उपस्थित सर्वांचे आभार मानले. या बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांसह सर्व बँकांचे व्यवस्थापक
उपस्थित होते.
*****
Thursday, 24 November 2016
प्रत्येक गावाचा जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे
उस्मानाबाद,दि.24:- जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासन आणि जनता यांनी
मिळून जलसंधारणाची उल्लेखनीय
कामगिरी केली, त्याचा या पावसाळ्यात
आपल्या सर्वांना चांगला प्रत्ययही आला.
आता जिल्ह्यात पाण्याचा मुबलक साठा निर्माण
झाला असून पाण्याच्या वापराबाबतचे योग्या ते नियोजन
करणे ही सर्वांचीच सामाजिक जबाबदारी
आहे . त्याकरिता संबंधित गावपातळीपासून ते जिल्हास्तरीय सर्व अधिकारी , स्थानिक स्वराज्य
संस्थांचे प्रतिनिधी असे सर्वांनीच
मिळून प्रत्येक गावाचा जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा तयार करावा , असे जिल्हाधिकारी
डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे सूचित केले .
पाणी आरक्षण , पाणी नियोजन
याबाबत अत्यंत महत्वपूर्ण बैठक आज
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्यावेळी
ते बोलत होते . यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
आनंद रायते , निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव ,
जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे , जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हे उपस्थित होते .
जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तलाठी व ग्रामसेवकांची बैठक घ्यावी
व संभाव्य पाणी टंचाई असणारी गावे यांचा आढावा
घ्यावा , प्रकल्पात पाणी आहे परंतु विदयुत पुरवठा नसेल तर त्याबाबत आढावा घेण्यात यावा , पाणी वितरणाबाबत शाश्वत आराखडा तयार करण्यात यावा
, शासकीय टँकरची स्थिती कळवावी, प्रत्येक गावाचा जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा
तयार करुन आहे त्या पाण्याचा येणाऱ्या
मार्च ते जुलै या कालावधीपर्यत विनियोग करावा , दि.30 नोव्हेंबर पूर्वी जिल्हा कृषी
अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
करुन जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा तयार करावा , जलयुक्त शिवार योजनेतून किती
पाणी उपलब्ध झाले याचा अहवाल सादर करणे इत्यादी सूचना सर्व संबंधितांना यावेळी जिल्हाधिकारी
डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.
या बैठकीस
सर्व तहसिलदार , सर्व गट विकास अधिकारी , जिल्हा
परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.देवकर , जलसंधारण विभागाचे अधिकारी
आदी यावेळी उपस्थित होते .
Subscribe to:
Posts (Atom)


