Tuesday, 27 June 2017

सैन्य दलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी


उस्मानाबाद.दि.27:- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसुल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड,नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक २५ जुलै २०१७ ते ०३ ऑग्स्ट  २०१७  या कालावधीत SSB कोर्स क्रं. 43 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली आहे.
जिल्हयातील इच्छुक उमेदवारानी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय उस्मानाबाद येथे दिनांक   २० जुलै   2017 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लिक करुन त्यामधील उपलब्ध check list आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन तयाची दोन प्रतीमध्ये प्रिंट  तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ठ डाऊन लोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन नंतरच मुलाखतीस हजर रहावे.
केंद्रामध्ये एस एस बी कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र मुलाखतीला/कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे- कंम्बाईड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सविसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेचे असावे,एन. सी. सी. (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस एस बी  साठी शिफारस केलेली असावे,टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्स साठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे,यनिर्व्हसिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एस एस बी साठी शिफारस केल्याल्या यादीत  नाव असावे.
अधिक माहितीसाठी  प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0253/2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सु.मो.गोडबोले यांनी केले आहे.

"रोपे आपल्या दारी" योजनेंतर्गत सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्राचे उद्‌घाटन



           उस्मानाबाद, दि. 27 :- येथे वन विभागाच्या वतीने रोपे आपल्या दारी उपक्रमांतर्गत सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्राचे उद्‌घाटन  विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे करण्यात आले.
            वन महोत्सवात 4 कोटी वृक्ष लागवड या वर्षी दि.1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत करण्यात येणार असून या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने "रोपे आपल्या दारी" उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्र मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सुरु करण्यात आले असून या रोप विक्री केंद्रात आवळा, चिंच, सिताफळ, शेवगा, गुलमोहर, रेन ट्री, काटीसावर, करंज, शिवन, कांचन, कडूनिंब, बोर आदीचे रोपे  केवळ 6 ते 16 रुपये या  दरात देण्यात येणार असून याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेवून दि.1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत वृक्ष लागवड करुन मोठया प्रमाणावर वन महोत्सव साजरा करावा, असे आवाहन यावेळी विभागीय वन अधिकारी सातेलीकर यांनी केले.
यावेळी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण श्री.ए.एस.निकत, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक पवार,  वन परिमंडळ अधिकारी उस्मानाबाद श्री.ए.ए.घोडके, वन परिमंडळ अधिकारी तुळजापूर श्री.एम.ए.खोबरे, वनरक्षक श्री.एस.आर.कुलकर्णी, वनरक्षक आर.एन.शिन्दे, वनरक्षक एस.एच.साळूंके, वनमजूर आर.एस.माळी,  जेष्ठ पत्रकार महादेव नरोटे, अरविंद चौधरी, बिभिषण लोकरे, निसर्गप्रेमी श्री.खोत आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना सवलतीच्या दरात रोपांची विक्री करण्यात आली.

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा


           उस्मानाबाद, दि. 27 :-  राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार 28 जून 2017 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            बुधवार 28 जून 2017 रोजी पहाटे 5 वाजता सी.एस.टी.एम. लातूर एक्सप्रेसद्वारे उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. अधीक्षक अभियंता, महावितरण यांचे कार्यालय उस्मानाबाद येथे आगमन व DDUJY योजनेअंतर्गत देवळाली,कोंड ता.उस्मानाबाद, पाचपिंपळा,ता.परंडा व आयपीडीएस योजनेअंतर्गत भूम ता.भूम, हसेगाव ता.कळंब, उमरगा,उस्मानाबाद उपकेंद्रचे भूमीपूजन.स्थळ- अधीक्षक अभियंता, महावितरण यांचे कार्यालयाचे प्रांगण. दुपारी 11 ते 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यास्तव राखीव वेळ. स्थळ- अधीक्षक अभियंता महावितरण उस्मानाबाद यांचे कार्यालयाचे प्रांगण. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत लोकप्रतिनिधी समवेत बैठक स्थळ- अधीक्षक अभियंता महावितरण यांचे कार्यालयातील सभागृह. दुपारी 4 वा. पत्रकार परिषद. दुपारी 4.30 वा. उस्मानाबाद येथून लातूरकडे प्रयाण करतील.