उस्मानाबाद,
दि. 27 :- येथे वन विभागाच्या वतीने रोपे आपल्या दारी
उपक्रमांतर्गत सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्राचे उद्घाटन विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,जिल्हा
माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे
यांच्या हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे करण्यात आले.
वन
महोत्सवात 4 कोटी वृक्ष लागवड या वर्षी दि.1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत करण्यात
येणार असून या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने "रोपे आपल्या दारी"
उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्र मध्यवर्ती
प्रशासकीय इमारत येथे सुरु करण्यात आले असून या रोप विक्री केंद्रात आवळा, चिंच, सिताफळ,
शेवगा, गुलमोहर, रेन ट्री, काटीसावर, करंज, शिवन, कांचन, कडूनिंब, बोर आदीचे
रोपे केवळ 6 ते 16 रुपये या दरात देण्यात येणार असून याचा लाभ जास्तीत
जास्त नागरिकांनी घेवून दि.1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत वृक्ष लागवड करुन मोठया
प्रमाणावर वन महोत्सव साजरा करावा, असे आवाहन यावेळी विभागीय वन अधिकारी सातेलीकर
यांनी केले.
यावेळी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण
श्री.ए.एस.निकत, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक पवार,
वन परिमंडळ अधिकारी उस्मानाबाद श्री.ए.ए.घोडके, वन परिमंडळ अधिकारी
तुळजापूर श्री.एम.ए.खोबरे, वनरक्षक श्री.एस.आर.कुलकर्णी, वनरक्षक आर.एन.शिन्दे,
वनरक्षक एस.एच.साळूंके, वनमजूर आर.एस.माळी, जेष्ठ पत्रकार महादेव नरोटे, अरविंद चौधरी, बिभिषण
लोकरे, निसर्गप्रेमी श्री.खोत आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या
हस्ते नागरिकांना सवलतीच्या दरात रोपांची विक्री करण्यात आली.