उस्मानाबाद.दि.27:- भारतीय
सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी
या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय
महसुल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड,नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे
महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक २५ जुलै २०१७ ते ०३ ऑग्स्ट २०१७ या कालावधीत SSB कोर्स क्रं. 43 चालविण्याचे
आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय
विनामूल्य करण्यात आलेली आहे.
जिल्हयातील
इच्छुक उमेदवारानी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक
कल्याण कार्यालय उस्मानाबाद येथे दिनांक २० जुलै
2017 रोजी
मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेज वरती
किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील
Recruitment Tab ला क्लिक करुन त्यामधील उपलब्ध check list आणि महत्वाच्या तारखा
यांचे अवलोकन करुन तयाची दोन प्रतीमध्ये प्रिंट
तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ठ डाऊन लोड करुन त्यांचीही दोन
प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन नंतरच मुलाखतीस हजर रहावे.
केंद्रामध्ये
एस एस बी कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे
व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र मुलाखतीला/कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे-
कंम्बाईड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी
एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सविसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी
पात्र झालेचे असावे,एन. सी. सी. (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेड मध्ये पास झालेले
असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस एस बी
साठी शिफारस केलेली असावे,टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्स साठी एसएसबी
मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे,यनिर्व्हसिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले
असावे अथवा एस एस बी साठी शिफारस केल्याल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी
प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक या
कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0253/2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सु.मो.गोडबोले
यांनी केले आहे.