उस्मानाबाद.दि.1:-
राज्यशासनाची 4 कोटी वृक्ष लागवड मोहिम दि. 01 ते 07 जुलै 2017 या कालावधीत सुरु
असल्याने उस्मानाबाद जिल्हयात
सहपालकमंत्री श्री. महादेव जानकर यांच्या हस्ते शासकीय आयुर्वेद महाविद्यालय
प्रांगणात वृक्ष लागवड करुन मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला.
या वृक्षारोपन लागवड कार्यक्रमास
उस्मानाबाद जिल्हयाचे पालक सचिव महेश
पाठक, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस
अधीक्षक पंकज देशमुख, विभागीय वन अधिकारी राजेश्वर आतेलीकर, आमदार
सुजितसिंह ठाकूर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.डी. कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
सहपालकमंत्री श्री. जानकर यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात भेट देवून पाहणी
केली. उस्मानाबाद येथील आयुर्वेद महाविद्यालय सर्व सोयींनी युक्त करु यासाठी निधी
कमी पडू दिला जाणार नाही असे सांगीतले. प्रत्येक रुग्ण कक्षात जावून त्यांनी
रुग्णांशी संवाद साधून रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.