उस्मानाबाद,दि.3:- लोकशाही दिनातील प्रलंबीत तक्रारीचा वेळेत निपटारा करावा, अशा
स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. यावेळी
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र
खंदारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) सचिन
बारवकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, उप
मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत)अजिंक्य पवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
श्रीमती सुनिता मते, पोलीस उप अधीक्षक श्रीमती
गोपिका जहागिरदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात,
जिल्हा उपनिबंधक श्री जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
लोकशाही
दिनाच्या बैठकीला येताना मागील लोकशाही दिनातील तक्रारीच्या कार्यवाहीचा अहवाल
घेवून अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे,अंतिम चौकशी करुन प्रलंबित अर्ज तात्काळ
निकाली काढावेत व पूर्तता अहवाल सादर
करावा, अशा सूचना ही जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी
आयोजित लोकशाही दिनात 30 तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये महसूलच्या 10,
वन विभाग 1, जिल्हा परिषद 8, वीज महावितरण कंपनी 2, पोलीस दल 3, कृषी 2, सहकार 1, नगर
परिषद 3,आदी विभागाशी संदर्भात तक्रारींचा समावेश होता.