उस्मानाबाद,दि.3: चार कोटी
वृक्षलागवडीचा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी काटेकोर
नियोजन करण्यात आले आहे. शासनाव्यतिरिक्त नागरीक व संस्थांना वृक्षलागवडीची नोंद
करता यावी यासाठी माय प्लान्टस मोबाईल
ॲप तयार करण्यात आला आहे. 01 जुलै 2017 रोजी हा ॲप कार्यान्वित होणार आहे.
01 ते 07 जुलै, 2017 या
कालावधीत सर्व जिल्हयात एकत्रित 4 कोटी वृक्षलागवड करुन ती मुलांच्या संगोपनासारखे
जोपासण्याचा व जिवंत ठेवण्याचा हिरवाकच संकल्प शासनाने केला आहे. उसमानाबाद
जिल्हयात हा संकल्प यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
यांच्या सूचनेनुसार काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. वृक्षलागवडीच्या या उपक्रमात
शासन यंत्रणेसह सर्वसामान्य नागरीक व सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग राहणार आहे.
शासनाच्या विभागांना दिलेल्या
उदीष्टानुसार करण्यात येणा-या वृक्षलागवडीची नोंद www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर
करता येणार आहे. सर्वसामान्य नागरीक, सामाजिक संस्था व इतर संस्थांना
वृक्षलागवडीची नोंद करण्यासाठी शासनाने My Plants हा मोबाईल ॲप तयार केला आहे. हा
ॲप केवळ 01.10 एमबी चा असल्याने तो सहज डाऊनलोड करता येईल.
असा आहे ॲप
या ॲपमध्ये वृक्षलागवडीची
माहिती कशा पध्दतीने भरावयाची हे दिले आहे. यामध्ये वृक्षलागवड करणा-यांचे नांव,
मोबाईल क्रमांक, कोणत्या जिल्हयात, कोणत्या तालक्यात वृक्षलागवड करण्यात आली आहे.
गाव आणि वृक्षलागवडीचे स्थळ, संख्या, कार्यक्रमात किती जणांचा सहभाग, किती रोपे
लागवड केली, वृक्षलागवडीचे छायाचित्र इत्यादी माहिती भरता येणार आहे ही माहिी कशी
भरावी यासाठी मार्गदर्शन म्हणून एक व्हिडीओ क्लिप तयार या ॲपमध्ये आहे. यात
भरण्यात आलेल्या माहितीची दखल शासनामार्फत घेण्यात येणार असल्यामुळे
वृक्षप्रेमी नागरीक व संस्थांसाठी हा ॲप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे
वृक्षप्रेमींनी हा ॲप डाऊनलोड करुन वनमहोत्सवात म्हणजेच 01 ते 07 जुलै2017 या
कालवधीत वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राजेश्वर सातेलीकर, विभागीय
वन अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.