उस्मानाबाद,दि.3: भारत
निवडणूक आयोगाने दिनांक 01 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीमध्ये तरुण व
पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21 वर्ष) मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम
राबविण्यात येत आहे.
वयोगट 18 ते 21 वर्ष पात्र
व्यक्तींनी मतदार यादीमध्ये नाव नोदणी करण्यासाठी नजीकच्या मतदान केंद्रात किंवा
तहसिल कार्यालयामध्ये आयोगाकडुन प्राप्त झालेले नवीन नमुना नंबर 6 मध्ये आपली
परिपूर्ण माहिती व त्यास आवश्यक लागणारी कागदपत्रांची पूर्तता करुन सदर फॉर्म
नजीकच्या मतदान केंद्रात अथवा तहसिल कार्यालयात जमा करावेत.
जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेत सहभाग घेऊन आले नाव
मतदार यादीमध्ये समाविष्ट करुन आपला मतदानाचा अधिकार प्राप्त करावा, असे आवाहन
उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.