Tuesday, 27 June 2017

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा


           उस्मानाबाद, दि. 27 :राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार 28 जून 2017 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            बुधवार 28 जून 2017 रोजी पहाटे 5 वाजता सी.एस.टी.एम. लातूर एक्सप्रेसद्वारे उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. अधीक्षक अभियंता, महावितरण यांचे कार्यालय उस्मानाबाद येथे आगमन व DDUJY योजनेअंतर्गत देवळाली,कोंड ता.उस्मानाबाद, पाचपिंपळा,ता.परंडा व आयपीडीएस योजनेअंतर्गत भूम ता.भूम, हसेगाव ता.कळंब, उमरगा,उस्मानाबाद उपकेंद्रचे भूमीपूजन.स्थळ- अधीक्षक अभियंता, महावितरण यांचे कार्यालयाचे प्रांगण. दुपारी 11 ते 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यास्तव राखीव वेळ. स्थळ- अधीक्षक अभियंता महावितरण उस्मानाबाद यांचे कार्यालयाचे प्रांगण. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत लोकप्रतिनिधी समवेत बैठक स्थळ- अधीक्षक अभियंता महावितरण यांचे कार्यालयातील सभागृह. दुपारी 4 वा. पत्रकार परिषद. दुपारी 4.30 वा. उस्मानाबाद येथून लातूरकडे प्रयाण करतील.