उस्मानाबाद,दि 26:-येथील सामाजिक न्याय भवन येथे
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्जवलनाने राजर्षी शाहू महाराज यांना पुष्प अर्पण करून
अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा
परिषदचे अध्यक्ष नेताजी पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रभारी मुख्य
कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिता मते,विशेष
अधिकारी (शानिशा) अमीत घवले,प्राध्यापक अर्जुन जाधव, शंकरराव खुणे,चंद्रप्पा
गायकवाड उपस्थित होते.
यावेळी राजर्षी
शाहू महाराज शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला.
प्राध्यापक जाधव यांनी राजर्षी शाहू महाराज
यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सखोल मार्गदर्शन केले तसेच मारन्वरांनी आपले मनोगत
व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
सुनिता मते यांनी केले तर आभार विशेष अधिकारी अमीत घवले यांनी मानले.