उस्मानाबाद,दि.
29 :- 2030 पर्यंत संपूर्ण राज्यात प्रत्येकाला सुरक्षित आणि शाश्वत वीज देण्यात
येणार असून उस्मानाबाद जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना डिजिटल
करण्यासाठी सौरऊर्जेने जोडण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची
घेाषणा राज्याचे ऊर्जा मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उस्मानाबादेत
केली.
विश्रामगृहावर आयेाजित लोकप्रतिनिधी
सोबतच्या आढावा बैठक व त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या
प्रकल्पासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्यास त्यास महावितरण आणि
महाराष्ट्र शासन सहकार्य करेल. याचबरोबर सर्व नळ योजनांनाही योग्य क्षमतेच्या सौर
पंपाने जोडण्याचा निर्णय त्यानी घेाषित केला.
जिल्हयात 16000 प्रतिक्षा यादीतील कृषीपंपाना
जोडण्यामागील वर्षभरात देण्यात आल्या असून उर्वरित 4000 पंपानाही अपेक्षित निधी
उपलब्ध करुन देण्यात येतील. वीज अपघात ठिकाणे शोधून तेथील तारा, रोहित्रे हटवून ग्राहकांना सुरक्षित वीज सेवा
देण्यासंदर्भातही त्यानी महावितरण अधिकाऱ्यांना सूचित केले. जिल्हयात लवकरच 500
सौर कृषी पंप बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यानी यावेळी दिली. प्रत्येक शाखा
कार्यालयाने दर महिण्यास एक वीज ग्राहक मेळावा घेवून ग्राहकांच्या तक्रारी
सोडविण्यात याव्या, त्याचे निरोप सर्व वीज ग्राहकांना देण्यात यावेत, त्यावर अधीक्षक
आणि मुख्य अभियंत्यांनी नियंत्रण ठेवावे, असेही आदेश मंत्री महोदयानी यावेळी
दिले. वीज विकासाची कामे गुणवत्ता पूर्ण
होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधीनी कायम लक्ष दयावे, असे आवाहनही ऊर्जा मंत्री श्री.बावनकुळे
यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा
सौ.अर्चनाताई पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अनिल काळे, मुख्य
अभियंता राजाराम बुरुड, गणपतराव मुंडे
आदी उपस्थित होते.