Monday, 26 June 2017

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन व समता दिंडीत उत्स्फूर्त सहभाग


उस्मानाबाद,दि.26: राजर्षी शाहू महाराज यांच्या 143 व्या  जयंतीनिनित्त  सामाजिक न्याय  दिनी आज येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रागणात भव्य एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीच्या प्रस्थानाच्यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हिरवी  झेंडी दाखवून  मार्गस्थ केले. शाहू महाराजांनी  दीनदलितासाठी पन्नास टक्के आरक्षण जाहीर केले तसेच विधवा पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन दिले,शाहू महाराज हे सामाजिक   राजा  होते  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गमे यांनी  केले.
        यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तससिलदार सुजित नरहरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिता मते, शिक्षणविस्तार अधिकारी संतोष माळी, मल्लीनाथ काळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी जाधव,दिनकर होळकर, मुख्याध्यापक जी.एम.परीट, सूधिर पडवळ तसेच कर्मचारी उपस्थित होते.
        या दिंडीमध्ये 14 शाळांमधील 1 हजार 100 विद्यार्थ्यांचा सहभाग होता,यामध्ये विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी व श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या समतारथाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीच्या मार्गक्रमणात जिल्हाधिकारी व प्रमुख उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
        प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शिक्षणाधिकारी माध्यमिक औंदुबर उकिरडे यांनी आभार मानले.