Wednesday, 28 June 2017

नऊ वीज उपकेंद्रांचे मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न



उस्मानाबाद.दि.28:- महावितरणतर्फे उस्मानाबाद जिल्हयात दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक वीज विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या नऊ वीज उपकेंद्रांचे भूमीपूजन अधीक्षक अभियंता कार्यालय परिसरात बुधवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
          जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राहुल मोटे,महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक (भा.प्र.से) श्री.ओमप्रकाश बकोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी दुपारी 1 वाजता जिल्हयातील कोंड,देवळाली,आवाडशिरपूरा, पाचपिंपळा,हासेगाव,काकडे प्लॅट उस्मानाबाद,उमरगा,तुळजापूर,भूम येथील वीज उपकेंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले.या कार्यक्रमास महावितरणचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड, पारेषणचे गणपतराव मुंडे, पायाभूत विकास आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.डी.डी.हांमद,अधीक्षक अभियंता बीडचे अजिनाथ सोनवणे, उस्मानाबादचे प्रकाश पौनीकर यांच्यासह सर्व अधिकारी पदाधिकारी, वीज ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार राहुल मोटे,आमदार सुजितसिंह ठाकूर यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम बुरुड यांनी केले.