Monday, 19 December 2016

अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या कामाची गरज – जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे


उस्मानाबाद.दि 16:- माहिती तंत्रज्ञानाचे सध्याचे युग आहे. अशा काळात अनेक पदांवर गंडांतर येवू शकते. महसूलच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अधिक जबाबदारीने चांगले काम करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी       डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
                 17 डिसेंबर रोजी  पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्याक्रम झाला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. नारनवरे होते. त्यावेळी ते बोलत होते.उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिराशे, तहसिलदार सुजित नरहरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख वृषाली तेलोरे, पोलीस पाटील संघटनेचे प्रदेश महासचिव श्रीकृष्ण साळूंके, मराठवाडा प्रमुख बळवंत काळे, जिल्हाध्यक्ष हारून काझी, सचिव धनंजय गुंड, दिनकर पाटील, राहुल वाकुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                   पुढे बोलताना डॉ. नारनवरे म्हणाले की, गावाची संपूर्ण माहिती असलेला कर्मचारी पोलीसपाटील आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या पदाची गरज कायम आहे.हे पद अधिक सक्षम होण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी  नेहमी संपर्कात राहून मार्गदर्शन करण्याची गरज आहे. पोलीस पाटलांनी गाव पातळीवर काम करताना डोळसपणे काम करून प्रशासनाला नेहमी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
                  डॉ.गिराशे म्हणाले की पोलीसपाटील पदाची गरज आज पूर्वीपेक्षाही जास्त आहे.हे प्रशासाच्या मदतीचे हात आहेत. त्यांनी राजकारणापासून अल्ति राहण्याचा प्रयत्न करावा. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यकरणारे पोलीस पाटील शाम पाटील (तोरंबा),  सुभाष कदम (पानवाडी), सुनिल पाटील(तुरोरी), विजय पाटील(ककासपूर), आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तुळजापूर नवरात्र महोत्सव काळात आपत्ती व्यवस्थापक म्हणून पोलीस पाटलांची सेवा घेतली होती. त्यांचे सहभागाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

     कार्यक्रमासाठी पोलीस पाटील संघटना मिडीया विभागाचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, ज्योतीराम काटे, प्रमोद माळी, हनुमंत देवकते, परेश शिंदे, अण्णासाहेब कोळेकर, महेश पाटील, बोराडे आदींनी पुढाकार घेतला. ****  

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची यादी अद्ययावत करण्यास मुदतवाढ


        उस्मानाबाद, दि.19:- पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा अद्यावत डाटाबेस दिनांक  18 जूलै 2016 पर्यंत तयार करण्यात आलेला आहे. ज्या पदवीधर अंशकालीन उमेदवारांनी आपला डाटाबेस शपथपत्रासह अद्ययावत केलेला नाही, अशा पदवीधरांनी जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांनी दिनांक 10 जानेवारी 2017 पर्यंत  कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आपआपल्या कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी व शपथपत्र (दोन प्रतीत) कार्यालयास सादर करावेत. तसेच दिनांक 18 जूलै 2016 पर्यंत ज्या उमेदवारांनी आपला डाटाबेस शपथपत्रासह अद्यावत केलेला आहे, अशा उमेदवारांना डाटा बेस अद्यावत करण्याची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे,  सहाय्यक संचालक रमेश पवार यांनी केले आहे.

                                                                   ******

Sunday, 18 December 2016

अल्पसंख्यांकांच्या समस्या-अडचणी व मागणीबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल --अप्पर जिल्हाधिकारी श्री. अविनाश पाठक





          उस्मानाबाद , दि. 18:- आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन जगभरात दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने अल्पसंख्यांक समुदायाच्या अधिकारांचे रक्षण, राष्ट्र निर्मितीमधील योगदानाबद्दल तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या विविध क्षेत्रातील त्यांच्या भाषा, जाती, धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या सुरक्षिततेच्या हेतुने हा दिवस साजरा करण्यास 18 डिसेंबर 1992 रोजी प्रारंभ केला आहे. राष्ट्रीय वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन हा दिवस साजरा केला जातो.  या दिनाचे औचित्य साधून  उपस्थितांना मार्गदर्शन करताना अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी  आर्थिक सबळता  अतिशय महत्वाची असून अल्पसंख्यांकांच्या समस्या-अडचणी, व मागणीबाबत शासनस्तरावर  पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालय व  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने  आज दिनांक 18 ‍डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक  हक्क दिनाचा कार्यक्रम  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  संपन्न झाला त्यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. अविनाश पाठक बोलत होते.
          या कार्यक्रमात उप जिल्हाधिकारी श्री. अरविंद लाटकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले .
          यावेळी उप जिल्हाधिकारी  श्री. सचिन बारवकर, उप जिल्हाधिकारी श्री. प्रभोदय मुळे , उप जिल्हाधिकारी श्री. अरविंद लाटकर , शिक्षणाधिकारी श्री. सचिन जगताप, शिक्षणाधिकारी श्री.औदुंबर उकिरडे,पोलीस उपअधीक्षक श्रीमती जहांगिरदार,  शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण )श्री. राठोड,  ॲड. मोहम्मद मोरवे ,  सेवानिवृत्त तहसिलदार  तथा  महाराष्ट्र  प्रदेश  काँग्रेस कमिटी , अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष श्री. इक्बाल  हुसेन सय्यद , श्री. मसूद शेख ,  श्री. अलीम मौलाना , डॉ. तब्बसूम सय्यद  आदी उपस्थित होते .
          या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. बशीर तांबोळी यांनी केले तर  आभार डॉ. तब्बसूम सय्यद यांनी मानले .
****