Monday, 19 December 2016

अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या कामाची गरज – जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे


उस्मानाबाद.दि 16:- माहिती तंत्रज्ञानाचे सध्याचे युग आहे. अशा काळात अनेक पदांवर गंडांतर येवू शकते. महसूलच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अधिक जबाबदारीने चांगले काम करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी       डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
                 17 डिसेंबर रोजी  पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्याक्रम झाला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. नारनवरे होते. त्यावेळी ते बोलत होते.उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिराशे, तहसिलदार सुजित नरहरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख वृषाली तेलोरे, पोलीस पाटील संघटनेचे प्रदेश महासचिव श्रीकृष्ण साळूंके, मराठवाडा प्रमुख बळवंत काळे, जिल्हाध्यक्ष हारून काझी, सचिव धनंजय गुंड, दिनकर पाटील, राहुल वाकुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                   पुढे बोलताना डॉ. नारनवरे म्हणाले की, गावाची संपूर्ण माहिती असलेला कर्मचारी पोलीसपाटील आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या पदाची गरज कायम आहे.हे पद अधिक सक्षम होण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी  नेहमी संपर्कात राहून मार्गदर्शन करण्याची गरज आहे. पोलीस पाटलांनी गाव पातळीवर काम करताना डोळसपणे काम करून प्रशासनाला नेहमी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
                  डॉ.गिराशे म्हणाले की पोलीसपाटील पदाची गरज आज पूर्वीपेक्षाही जास्त आहे.हे प्रशासाच्या मदतीचे हात आहेत. त्यांनी राजकारणापासून अल्ति राहण्याचा प्रयत्न करावा. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यकरणारे पोलीस पाटील शाम पाटील (तोरंबा),  सुभाष कदम (पानवाडी), सुनिल पाटील(तुरोरी), विजय पाटील(ककासपूर), आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तुळजापूर नवरात्र महोत्सव काळात आपत्ती व्यवस्थापक म्हणून पोलीस पाटलांची सेवा घेतली होती. त्यांचे सहभागाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

     कार्यक्रमासाठी पोलीस पाटील संघटना मिडीया विभागाचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, ज्योतीराम काटे, प्रमोद माळी, हनुमंत देवकते, परेश शिंदे, अण्णासाहेब कोळेकर, महेश पाटील, बोराडे आदींनी पुढाकार घेतला. ****