उस्मानाबाद , दि. 18:- आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन
जगभरात दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने
अल्पसंख्यांक समुदायाच्या अधिकारांचे रक्षण, राष्ट्र निर्मितीमधील योगदानाबद्दल
तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या विविध क्षेत्रातील त्यांच्या भाषा, जाती, धर्म,
संस्कृती, परंपरा यांच्या सुरक्षिततेच्या हेतुने हा दिवस साजरा करण्यास 18 डिसेंबर
1992 रोजी प्रारंभ केला आहे. राष्ट्रीय वांशिक, धार्मिक आणि भाषिक
अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन हा दिवस साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून उपस्थितांना मार्गदर्शन करताना अल्पसंख्यांकांच्या
विकासासाठी आर्थिक सबळता अतिशय महत्वाची असून अल्पसंख्यांकांच्या
समस्या-अडचणी, व मागणीबाबत शासनस्तरावर
पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त
विद्यमाने आज दिनांक 18 डिसेंबर रोजी
अल्पसंख्यांक हक्क दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला त्यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री.
अविनाश पाठक बोलत होते.
या कार्यक्रमात उप जिल्हाधिकारी श्री. अरविंद लाटकर यांनीही
उपस्थितांना मार्गदर्शन केले .
यावेळी उप जिल्हाधिकारी
श्री. सचिन बारवकर, उप जिल्हाधिकारी श्री. प्रभोदय मुळे , उप जिल्हाधिकारी
श्री. अरविंद लाटकर , शिक्षणाधिकारी श्री. सचिन जगताप, शिक्षणाधिकारी श्री.औदुंबर
उकिरडे,पोलीस उपअधीक्षक श्रीमती जहांगिरदार,
शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण )श्री. राठोड, ॲड. मोहम्मद मोरवे , सेवानिवृत्त तहसिलदार तथा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , अल्पसंख्यांक विभागाचे
उपाध्यक्ष श्री. इक्बाल हुसेन सय्यद ,
श्री. मसूद शेख , श्री. अलीम मौलाना , डॉ.
तब्बसूम सय्यद आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. बशीर तांबोळी यांनी केले
तर आभार डॉ. तब्बसूम सय्यद यांनी मानले .
****