उस्मानाबाद.दि 21:- अनुसूचित
जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी
ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिव्हेटर , रोटाव्हेटर व ट्रेलर इत्यादींचा पुरवठा
करण्याची योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या स्वयंसहाय्यता
बचत गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवाशी असावेत. एकूण सदस्यांपैकी 80
टक्के सदस्य हे अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. तसेच स्वयंसहाय्यता बचत गटाचे व
गटातील प्रत्येक सदस्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याचे व हे खाते सदर
सदस्याच्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. तेव्हा या योजनेचा लाभ
घेण्यासाठी जिल्हयातील अनुसूचित जाती व
नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी कार्यालयातील विहीत नमुन्यातील अर्ज
चेकलिस्टप्रमाणे कागदपत्रांसह सादर करावेत. अर्जाची झेरॉक्स प्रत स्विकारली जाणार
नाही. अर्ज सादर करण्याचा अंतिम दि. 5 जानेवारी
2017 पर्यंत असा राहील. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज
कल्याण या कार्यालयास संपर्क साधावा. असे
आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. एस.एस. शेळके यांनी केले आहे.
*****