उस्मानाबाद.दि 21:-
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन
(ग्रामीण) व पंचायत समिती उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील पंचायत
समिती परिसरात स्वच्छता करून स्वच्छता अभियान राबविले.
सर्वप्रथम पंचायत समिती सभागृहात स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगेबाबा
यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .आनंद रायते
यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री. शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो)
श्री. रावसाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. शेखर
जाधव, गट विकास अधिकारी श्री. चकोर, पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार,
पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री
.रायते म्हणाले की जिल्हयातील नागरिकांनी
स्वच्छता अभियानात हिरिरीने सहभाग नोंदवून प्रत्येकाने घरी शौचालय बांधले पाहिजे. यापुढे जिल्ह्यात माजी सैनिकांच्या
सहभागातून शौचालय नसणाऱ्या कुटूंबाना स्वच्छतेचे महत्व सांगण्यात येणार आहे.
शौचालय नसणाऱ्या कुटूंबातील महिलांसाठी निर्धार मेळावे आयोजित करून शौचालय बांधकाम
करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. स्मार्ट व्हिलेजसाठी स्वच्छता ही अत्यंत
महत्वाची असून गावातील स्वच्छतेची ड्रोनद्वारे पाहणी करून स्वच्छतेवर आधारित लाभार्थी
निवड व गाव विकासासाठी निधी मिळणार आहे. गावामध्ये जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालय बांधकाम
करण्यात यावीत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बसण्याच्या ठिकाणीही नियमित स्वच्छता
ठेवावी जेणेकरून कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. असेही श्री. रायते यांनी यावेळी
सांगितले.
*******


