उस्मानाबाद,दि.19:- युवकांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून काम केले तर व्यक्तिमत्व
विकासासोबतच देशाचाही विकास घडून येईल,असा विश्वास भाजपाचे प्रदेश
सरचिटणीस तथा आमदार श्री सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.
नेहरु युवा केंद्र उस्मानाबादमार्फत युवा
नेतृत्व व सामाजिक विकास कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी युवकांना मार्गदर्शन
करताना बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री दत्ताभाऊ कुलकर्णी,श्री
नितीन काळे,श्री सतीश देशमुख, अॅड खंडेराव चौरे प्रमुख वक्ते श्री अशोक चव्हाण (जहागीरदारवाडी) हे
उपस्थित होते.
नेहरु युवा केंद्राच्या वतीने पाच
दिवसाच्या या शिबिराचा समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
झाला. नेहरु युवा केंद्राचे लेखापाल श्री रामचंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात
कार्यक्रम आयोजनाची भूमिका मांडली, प्रमुख पाहुण्यांच्या
स्वागतानंतर सहभागींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
आमदार सुजितसिंह ठाकूर पुढे बोलताना
म्हणाले की, नेहरु युवा केंद्राची चळवळ देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी
चळवळ यामधुन युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतात. युवकांना दिशा
देण्यास,युवकांमध्ये देशभक्ती, देशप्रेम व सामाजिक जाणीव निर्माण करुन देण्याचे काम नेहरु युवाकेंद्रामार्फत केले. या केंद्राच्या
स्थापनेपासून म्हणजे 1989 पासून सतत संपर्कामधून असून सर्व
उपक्रम,
शिबीर प्रशिक्षणामध्ये मी सहभाग नोंदविला असून मला व माझ्या युवा
मंडळाला नेहरु युवा केंद्राचा जिल्हा युवा पुरस्कार मिळाला असून, माझ्या
या सर्व जडण-घडणीमध्ये नेहरु युवा
केंद्राचे स्थान खूप
मोठे आहे.
आपण जर सातत्याने सामाजिक विकासाच्या चळवळीत
कार्यरत राहिले तर एक निश्चितच एक दिवस आपण आपले ध्येय प्राप्त केल्याशिवाय राहात नाही, युवकांना
त्यांनी असे अवाहन केले की, तुम्ही
या देशविकासाच्या चळवळीमध्ये स्वत:ला झोकून घ्या ,जेणेकरुन समाजाची प्रगती होऊन देश
महासत्ता बनण्यासाठीच्या मार्गात आपले योगदान दिल्याचे समाधान मिळाल्याशिवाय
राहणार नाही.
ते पुढे बोलताना म्हणाले की, युवकांनी
सतर्क आणि क्रियाशील राहिले पाहिजे,
युवक हा या देशाचा आधारस्तंभ असून, युवकांना
व्यसनाधीनतेपासून दूर राहिले पाहिजे. सशक्त युवक हा देशास
प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे युवकांनी डोळसपणे आपली
जडण-घडण केली पाहिजे.
या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचलन
एन.वाय.व्ही रुपेश उमरदंड यांनी तर आभार प्रदर्शन
प्रतिभा जाधव हीने
केले.
कार्यक्रमासाठी
जिल्हयातील सर्व तालुक्यातील युवा मोठया संख्येने उपस्थित होते.
****
