उस्मानाबाद, दि.19:- पदवीधर अंशकालीन
उमेदवारांचा अद्यावत डाटाबेस दिनांक 18
जूलै 2016 पर्यंत तयार करण्यात आलेला आहे. ज्या पदवीधर अंशकालीन उमेदवारांनी आपला
डाटाबेस शपथपत्रासह अद्ययावत केलेला नाही, अशा पदवीधरांनी जिल्ह्यातील पदवीधर
अंशकालीन उमेदवारांनी दिनांक 10 जानेवारी 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष हजर
राहून आपआपल्या कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी व शपथपत्र (दोन प्रतीत)
कार्यालयास सादर करावेत. तसेच दिनांक 18 जूलै 2016 पर्यंत ज्या उमेदवारांनी आपला
डाटाबेस शपथपत्रासह अद्यावत केलेला आहे, अशा उमेदवारांना डाटा बेस अद्यावत
करण्याची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे, सहाय्यक
संचालक रमेश पवार यांनी केले आहे.
******