उस्मानाबाद , दि. 20 :- मंडळ विनियम 1977 नियम क्र. 46 अन्वये मार्च 2017 मध्ये होणाऱ्या
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
(इ.10वी) परीक्षेस नियमित प्रवष्ठि होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित, पुनर्परीक्षार्थी , नाव
नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त
झालेले खाजगी विद्यार्थी , श्रेणी सुधार योजनेंतर्गत
व तुरळक विषयासी परीक्षेस
प्रविष्ठ होणाऱ्या व विलंब
शुल्कासह ऑनलाईन परीक्षेची
आवेदनपत्र स्विकारण्याची मुदत
संपल्यानंतरही श्रेणी/ तोंडी / प्रात्यक्षिक
परीक्षा सुरु होण्यापूर्वी 33 दिवसांचा
कालावधी वगळून त्या अगोदर
प्रतिदिन रु. 50/- प्रमाणे अतिविलंब
शुल्क , अतिविलंब शुल्काच्या
निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा
प्रात्यक्षिक परीक्षेच्या अगोदर जी
परीक्षा सुरु होणार आहे , त्यातील सुरुवातीच्या
15 दिवसांपर्यंत प्रती
विद्यार्थी प्रतिदिन रु. 100/- व तद्नंतरच्या 15 दिवसांकरिता व परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत
रु. 200/- प्रमाणे अतिविशेष अतिविलंब
शुल्क आकारुन आवेदनपत्र
स्विकारण्याच्या तारखा
पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत
.
अतिविलंब शुल्क भरण्यासाठी
अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2016 ते 15 जानेवारी 2017, विशेष अतिविलंब शुल्क
भरण्यासाठी अंतिम दिनांक 16 ते 30 जानेवारी 2017, अति विशेष अतिविलंब शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक 31
जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2017 असा राहील . दिनांक 13 डिसेंबर 2016 नंतर प्राप्त होणारी आवेदनपत्रे ही शाळांनी स्वहस्ताक्षरात भरुन तयावर विद्यार्थी व मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह मंडळास
सादर करण्यात याव्यात. हे
आवेदनपत्र मंडळाच्या संकेतस्तळावर उपलब्ध
आहे .
असे विभागीय
सचिव , लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले
आहे .