राज्यातील अशा
प्रकारचा पहिला अभिनव उपक्रम
उस्मानाबाद,दि.22 :- स्त्री
रूग्णालय उस्मानाबाद येथे जन्मलेल्या नवजात अर्भकाचे जन्मत: मोफत आधार कार्ड
नोंदणी उपक्रमाचे उदघाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा
पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते
आज संपन्न झाले.
या नवजात अर्भकांचे जन्मत: आधार कार्ड नोंदणी कार्यक्रमास आमदार ज्ञानराज
चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले,
शासकीय रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना
पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, हा उपक्रम उस्मानाबाद जिल्हयातच नव्हे तर
महाराष्ट्रात प्रथम असा अभिनव उपक्रम राबविण्याचा मान जिल्हा रूग्णालयाने मिळविला
आहे असे गौरउदगार त्यांनी काढले. प्रारंभी पालकमंत्री यांच्या हस्ते आधार कार्ड
नोंदणी उपक्रमाचे उदघाटन करुन नवजात बालकाचे आधार नोंदणी कार्ड बालकाच्या आई कडे
सुपूर्द केले.
या कार्यक्रमाची माहिती विशद करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले
म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हयात याउपक्रमाची सुरूवात दि.23 सप्टेंबर 2016 पासून
करण्यात आली आहे. त्यानुसार रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी दररोज प्रसूती
मातांना व त्याच्या नातेवाईकांना जन्मत: आधार कार्ड नोंदणी करण्याबाबत समुपदेशन
करत आहेत. तसेच ज्या प्रसूती माताचे आधार कार्ड नोंदणी झालेले नाही अशा प्रसूती
झालेल्या माताची देखील आधार कार्ड नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
रुग्णालयात लसिकरणासाठी आलेल्या बालकाचे आधार कार्ड नोंदणी करित असून या
उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्हयात जास्तीत जास्त आधार कार्ड नोंदणी
होण्याच्या दृष्टीने रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दि.23
सप्टेंबर 2016 पासून आजतागायत 597 जन्मत: आधार कार्ड नोंदणी झालेली आहे, असे ही
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ
माले यांनी सांगितले.
जन्मलेल्या नवजात अर्भकांचे जन्मत: आधार कार्ड नोंदणी उपक्रम जिल्हाधिकारी
डॉ. प्रशांत नारनवरे, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या
मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. के.बी. कोंडेकर व सहायक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. पी. एन.रुकमे , श्री. अमित चापले , श्री.
लक्ष्मण कांबळे यांच्या माध्यमातून
राबविण्यात येत आहे.

