उस्मानाबाद,दि.14:- जिल्हा परिषद
पंचायत समिती सार्वत्रिक
निवडणूक -2017 च्या अनुषंगाने मतदार जनजागृती
कक्षांच्या पुढाकाराने दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी मतदानाची टक्क्केवारी
वाढविण्याच्या दष्टाकोनातून आठवडी बाजार असलेल्या बेंबळी, तेर, येडशी, समुद्रवाणी, ढोकी व
कसबे तडवळे तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. या
सर्व गावात मतदार
उपस्थित होते.
आज दि. 14
फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11-00 वाजता
तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात
कलापथकाद्वारे पथनाट्य सादर
करण्यात आले.
या मतदान जनजागृती
अभियानात उपजिल्हाधिकारी तथा
निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी
शिरीष बनसोडे, नायब तहसिलदार राजेश
जाधव, कक्ष प्रमुख सविता भोसले यांच्यासह उपस्थित होते.