उस्मानाबाद,दि.18:-बालकांच्या
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणांतर्गत दुर्बल आणि वंचित घटकांना विनाअनुदानित आणि कायम
विनाअनुदानित शाळांमध्ये किमान 25 टक्के प्रवेश कोटयाची तरतूद आहे.
पालकांनी आपल्या नजिकच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. वंचित
( एस.सी.एस.टी व विकलांग ) दुर्बल घटक ( ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक
उत्पन रुपये 1 लाखापर्यंत आहे. अशा खुल्या प्रवर्गासह,विमुक्त व भटक्या जाती,इतर मागास,
विशेष मागास व धार्मिक अल्पसंख्यांक मुस्लिम, बौध्द,खिश्चन,पारसी,जैन,व शीख)
यांच्यासाठी राखीव 25 टक्के आहेत.ही प्रक्रिया सुरू झालेली आहे.प्रवेश प्रक्रियेचा
आढावा घेतला असता.बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये नर्सरी/पहिली च्या
वर्गासाठी राखीव असलेल्या जागा बऱ्याच
रिक्त असलेल्या निदर्शनास आले आहे.
तरी पालकांनी student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दि.25
फेंब्रुवारी 2017 पर्यंत ऑनलाईल अर्ज भरावेत,जास्तीत जास्त पालकांनी या शासकीय
योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. सचिन जगताप
यांनी केले आहे.