उस्मानाबाद,दि.13:
महाराष्ट्रात शारिरीक शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचविण्यासाठी आणि
राज्यातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी वैज्ञानिक पध्दती, अद्ययावत उपकरणे आणि
प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात भर
देण्याची गरज आहे. या उद्देशाने राज्यातील
खेळ, परंपरा, आंतर्सामर्थ्य
व खेळ सुविधा लक्षात घेऊन राज्यात पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठाची स्थापना
केलेली आहे. सध्या क्रीडापीठांतर्गत राज्यात विविध ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सुरु
करण्यात आलेल्या आहेत. या क्रीडा प्रबोधिनीमध्ये 8 ते 14 वयोगटातील मुला-मुलींची भारतीय
क्रीडा प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ टेस्टद्वारे निवड करुन त्यांना
विविध खेळांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांच्या
मार्गदर्शनाद्वारे दिले जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे या
क्रीडापीठाच्या उद्देशाच्या पूर्तीकरीता क्रीडाप्रबोधिनीमार्फत वैज्ञानिक पध्दतीचा
अवलंब करुन खेळाची अद्ययावत उपकरणे व प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात लक्ष केंद्रीत
करुन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड
झालेल्या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षणासोबतच मराठी व इंग्रजी माध्यमाची शालेय
शिक्षणाची सोय, निवासव्यवस्था, भोजनव्यवस्था
वैद्यकीय सुविधा, मनोरंजन सुविधा, संगणक
प्रशिक्षण, शैक्षणिक सहली, विमा
संरक्षण,
गणवेष, तंत्रशुध्द आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा मार्गदर्शनांसह विविध सुविधा दिल्या जातात.
यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील / शाळेतील/
शाळेत जात नसलेल्या परंतु उत्कृष्ट शारिरिक क्षमता असलेल्या, 8 ते 14 वर्ष वयोगटातील मुले/ मुलींच्या नैपुण्य
चाचण्या पुढीलप्रमाणे आयोजित केल्या आहेत-एकूण 9 चाचण्या (प्रत्येकी कमाल 3 गुण)
आयोजित करावयाच्या आहेत- वजन, उंची , 30 मी. भरधाव धावणे, 800 मी. धावणे, 6 X 10 मी. शटल रन,उभे राहून लांब उडी, उभे राहून उंच उडी, मेडिसीन बॉल थ्रो व लवचिकता अशा एकूण 27 गुणांच्या
चाचण्यांचे आयोजन करुन यात किमान 17 गुण
प्राप्त करणारे मुले/मुली पुढील तालुकास्तरावरील चाचणीसाठी
पात्र राहतील. तसेच या चाचण्यांचा अहवाल शाळा प्रमुखांनी संबंधित तालुका
क्रीडा संयोजकांकडे दि. 17 फेब्रुवारी
2017 पर्यंत सादर करावा.
तालुकास्तरावर वरीलप्रमाणे एकूण 9 चाचण्या
आयोजित करुन त्यात 17 किंवा
त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या मुला-मुलींना जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी
उपस्थित राहता येईल. तालुकास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्या दिनांक 15 ते 21 फेब्रुवारी 2017 पर्यंत सकाळी 8.00
वाजता संबंधित तालुका संयोजकांनी घोषीत केलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात येतील.
तालुकास्तरावरील चाचण्यांचा अहवाल संबंधित तालुका संयोजकांनी दिनांक 23 फेब्रुवारी
2017 पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर
करावयाचा आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे
दिनांक 28 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 8.00 वाजता श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे आयोजन केले आहे. या निवड
चाचण्यांसाठी तालुका संयोजक
पुढील प्रमाणे राहतील - उस्मानाबाद- जि.प. प्रशाला काजळा श्री.बिभीषण पाटील मो.
नं 9922660397, कळंब- शहीद
भगत सिंग
प्रशाला श्री. एल. एम.मोहिते मो. नं. 9423718902, परंडा-
न्यू हायस्कूल अनाळा श्री. सचिन पाटील मो.नं .9921699863, तुळजापूर-
श्री. विष्णू दळवी, तालुका क्रीडा संकूल मो.नं. 9270917700, उमरगा- सखुबाई माध्यमिक आश्रमशाळा, बलसूर श्री. राजू सोलनकर
मो.नं. 9665315110, भूम- न्यू
हायस्कूल, ईट श्री. बाघुंबरे व्ही.बी मो.नं 9923518577, लोहारा- आष्टा हायस्कूल आष्टा कासार श्री.
मुकेश सोमवंशी, मो.नं
9767777176
, वाशी-
श्री. अभय वाघोलीकर मो.नं.
9405750149.
तरी जिल्ह्यातील 8 ते 14 वर्ष वयोगटातील जास्तीत
जास्त मुला-मुलींनी या निवड
चाचण्यांत सहभाग घ्यावा व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे मुख्य क्रीडा मार्गदर्शक श्री. एम. झेड शेख मो.नं 9850351717 यांच्याशी संपर्क साधावा, असे
आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी श्री. संजय महाडिकयांनी केले आहे.