उस्मानाबाद.दि.13:- जिल्ह्यात दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे . हा उत्सव शांततेत पार
पडावा व मिरवणुकांदरम्यान वाहतुकीचे नियंत्रण
व नियमन करणे आवश्यक आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी , या उत्सवा
दरम्यान तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ मात करता यावी .
तसेच सडकांवरील
किंवा सडकेने जाणाऱ्या मिरवणुकीतील
किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने
चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी
ठेवावी याविषयी निर्देश देणे, मिरवणुका कोणत्या मार्गाने जाव्यात ते मार्ग विहित करणे, प्रतिमा
पुजनाच्या वेळी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा
निर्माण होण्याची शक्यता असेल अशा ठिकाणी अडथळा होऊ न देणे , सार्वजनिक
ठिकाणी कर्कश वाद्य वाजविणे यावर नियंत्रण
ठेवणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे
जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकाऱ्यांना दिनांक 18 ते 20 फेब्रुवारी 2017 पर्यंत पूर्ण
अधिकार प्रदान केले असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कळविले आहे .