Monday, 13 February 2017

मद्यविक्रीस बंदी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2017 

उस्मानाबाद.दि.13:-  जिल्ह्यात  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मतदान व दिनांक 23 फेब्रुवारी रोजी होणारी मतमोजणीची प्रक्रीया शांततेत व सुव्यवस्थित पार पडावेत म्हणून  दिनांक 16 व 23 फेब्रुवारी या दोन्ही दिवशी संपूर्ण  दिवस सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या मद्यविक्रीसाठी बंद ठेवण्यात येतील.
            या प्रमाणे आदेशित करण्यात येत असून या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुध्द मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 54 व 56 अन्वये कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी,असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी कळविले आहे.