उस्मानाबाद,दि.13:- सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक-युवतींसाठी
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत सन 2016-17 या वर्षासाठी प्रशिक्षणार्थी यांच्या
उद्दिष्टाप्रमाणे 70 टक्के पुरूष व 30
टक्के महिलाची निवड करावयाची आहे. तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील इयत्ता 12 वी उत्तीर्ण असलेल्या वय
18 ते 25 युवक-युवतींनी पुढीलप्रमाणे कागदपत्रांसह सहाय्यक आयुकत् समाज कल्याण
यांच्याकडे अर्ज करावेत.
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा, इयत्ता 12 वी
उत्तीर्ण असावा, उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास प्रशिक्षणार्थी यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल,
उमेदवारांची उंची पुरूष-165 सें.मी. असावी, छाती -79 से.मी.व
फुगवून -84 से.मी., तसेच महिला उमेदवारांसाठी उंची -155 सें.मी.
असावी,उमेदवारांकडे सर्व शैक्षणिक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.निवड केलेल्या युवक-युवतींना प्रशिक्षणासाठी श्री.
हनुमान प्रसारक मंडळ, अमरावती येथे तीन महिन्यांच्या मोफत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात
येईल.
तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व
नवबौध्द संवर्गातील इच्छूक उमेदवारांनी
अर्ज दि.25 फेब्रुवारी 2017 पर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण
शिवाजी शेळके यांनी केले
आहे.