Friday, 8 September 2017

आपत्ती जोखिम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रमाची कार्यशाळा संपन्न

आपत्ती जोखिम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रमाची कार्यशाळा संपन्न 
उस्मानाबाद, दि. 7 :- विविध विभागाच्या विकासाच्या कामामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे मुद्दे सामिल करुन लोकांचे किंवा समुदायाचे संभाव्य आपत्ती व्य्वस्थापनाच्या वेळी नुकसान टाळता यावे, यासाठी आपत्ती जोखीम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रम या प्रकल्पसंदर्भात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्‌दघाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी, माजी उपाध्यक्ष आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण (बिहार राज्य) श्री. अनिल सिंह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन तज्ञ श्री. सरबजित सिंग सहोटा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, रेडआर इंडियाचे  कार्यकारी संचालक  श्री.तानाजी शेन तसेच मंदार वैद्य, प्रविण पवार, चंद्रकांत देवकर, शाबाज खान, तनुजा आदींसह जिल्ह्यातील विविध विभागाचे  प्रमुख यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासन, युनिसेफ व रेडआर इंडिया यांचा जिल्ह्यात संयुक्त पथदर्शी कार्यक्रम आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे म्हणाले की, जिल्ह्यास विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो कधी भुकंपानंतर जिल्ह्यात दुष्काळ, तीव्र पाणी टंचाई, अतिवृष्टी, पूर, वीज अशा अनेक आणि त्यामधुन उद्‌भवनाऱ्या धोक्यांना सामोरे जावे लागते अशा समस्यांमुळे विकासकामांना मोठया प्रमाणावर बाधा येते. त्यामुळे विविध विभागाच्या विकास आराखडयामध्ये आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा तपशीलवार समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पथदर्शी जिल्हा म्हणून आपला जिल्हा निवडला आहे ही एक चांगली संधी आहे,  याचा चांगला उपयोग करुन घेण्यासाठी प्रत्येक विभागाने आपत्ती जोखिम व्यवस्थापनासह विकास आराखडयाचे आपल्या विभागात काय नियोजन करता येते ते पाहावे, असे ही सांगितले.
सरबजित सिंह यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपत्ती जोखिम व्यवस्थापनाचे काम करताना संभाव्य आपत्तीचे धोके कमी करण्यासाठी जिल्हा, विभाग व गावपातळीवर शासकीय समन्वय यंत्रणा समृध्द झाली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये  मदतीबरोबर अन्य कामे ही केली पाहीजेत.
यावेळी अनिल सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याचे महत्व सांगितले. तसेच प्रत्येकाची सुरक्षा जशी महत्वाची आहे तसेच संभाव्य आपत्तीच्या वेळी प्रत्येक विभागाची ही सुरक्षा झाली पाहीजे, संभाव्य परिस्थितीला हाताळण्यासाठी पूरपरिस्थीतीमुळे साथ रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, विद्युत पुरवठा सुरळित ठेवण्यासाठी महावितरण कंपनी, दुरध्वनी सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी दुरसंचार विभाग, रस्त्यांने वाहतूकीचा संपर्क असावा यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागांनी ही सज्ज असले पाहिजे यासाठी सर्व विविध प्रमुखांनी आपल्या विभागाचा पुढाकार घेवून योगदान दयावे यासाठी ही कार्यशाळा आवश्यक आहे.
या कार्यक्रमाची थोडक्यात श्रीमती. तेलोरे यांनी रुपरेषा यावेळी विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार वैद्य यांनी केले, तर आभार चंद्रकांत देवकर यांनी व्यक्त केले

Tuesday, 5 September 2017

शौचालय बांधा व त्याचा नियमित वापर करा -महारुद्र गालट

उस्मानाबाद,दि.5 :- स्वच्छता अभियानात नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवून, प्रत्येकाने शौचालय बांधून त्याचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन नगरपरिषदेचे व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शहरातील शिवाजीनगर, नगरपालिका शाळा क्र. 6 च्या परिसरातील शिवप्रताप तरुण गणेश मंडळ आयोजित “संवाद पर्व” कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महारुद्र गालट बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. गजानन परळीकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांची उपस्थिती होती. 
महारुद्र गालट यांनी शौचालय बांधकामासाठी नगर परिषदेकडून मिळणारे अनुदान, बचत गट संकल्पना,  प्रधानमंत्री आवास योजना, स्वयंरोजगार उपांगाअंतर्गत विविध उद्योगांची निवड, कर्ज प्रकरण, बँक व्यवहार इत्यादी बाबत उपस्थित गणेश भक्तांना सविस्तर मार्गदर्शन केले.
            मृत्यूनंतर शरीराची पारंपरिक विधीनुसार विल्हेवाट लावली जाते. परंतु मृत्यूनंतरही आपण इतरांच्या कामी येऊ शकतो ते केवळ अवयवदानाच्या माध्यमातूनच. अवयवदानातून शरीराचे विविध महत्त्वपूर्ण भाग आणि कातडी गरजूंना मिळण्यास मदत होते. अवयवदान करतानाही शासन मोठ्या प्रमाणात काळजी घेऊन कडक नियमावलीचे पालन करते. रुग्ण व नातेवाईकांच्या संमतीनेच अवयव काढून गरजू रूग्णांना वेळेत अवयवाचे प्रत्यारोपन केले जाते. त्यासाठी डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन अवघड असे हे कार्य शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडावे लागते.
            अवयवदात्याचे अवयव काढल्यानंतर अतिशय आदरपूर्वक संबंधित शरीर त्यांच्या  नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात येते, अशी माहिती  डॉ. गजानन परळीकर यांनी यावेळी दिली. तसेच अवयवदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. संकल्प करावा, असेही डॉ. परळीकर म्हणाले. ज्येष्ठ, तरुण आणि चिमुकल्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी गणेशोत्सव काळातील “संवाद पर्व” या उपक्रमाच्या माध्यमातून शासनामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची, उपक्रमांची जनतेला माहिती व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली. 
प्रारंभी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन गणेश मंडळाचे अनिकेत पवार यांनी केले तर आभार श्री. विकी ढेकणे यांनी मानले. कार्यक्रमास गणेश मंडळाचे बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब कथले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण-तरूणी, बालवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्वच्छता अभियानात जिल्हयातील नागरिकांचाही सहभाग महत्वाचा महारुद्र गालट

उस्मानाबाद,दि.5 :-  2 ऑक्टोबर, 2017 पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याबाबतचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. यानुसार संपूर्ण जिल्ह्यातील शहरी क्षेत्र हागणदारीमुक्‍त करण्‍याच्‍या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केलेले आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक घरी शौचालय बांधून त्याचा वापर केला पाहिजे कोणीही मागे राहू नये, या अभियानात नागरिकांचाही सहभाग खूप महत्वाचा आहे असे प्रतिपादन नगरपरिषदेचे व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शहरातील गणेश नगर भागातील शिवसहयाद्री तरुण गणेश मंडळ आयोजित “संवाद पर्व” कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महारुद्र गालट बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. गजानन परळीकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांची उपस्थिती होती. 
महारुद्र गालट यांनी शौचालय बांधकामासाठी नगर परिषदेकडून मिळणारे अनुदान, बचत गट संकल्पना,  प्रधानमंत्री आवास योजना, स्वयंरोजगार उपांगाअंतर्गत विविध उद्योगांची निवड, कर्ज प्रकरण, बँक व्यवहार इत्यादी बाबत उपस्थित गणेश भक्तांना सविस्तर मार्गदर्शन केले.
            मृत्यूनंतर शरीराची पारंपरिक विधीनुसार विल्हेवाट लावली जाते. परंतु मृत्यूनंतरही आपण इतरांच्या कामी येऊ शकतो ते केवळ अवयवदानाच्या माध्यमातूनच. अवयवदानातून शरीराचे विविध महत्त्वपूर्ण भाग आणि कातडी गरजूंना मिळण्यास मदत होते. अवयवदान करतानाही शासन मोठ्या प्रमाणात काळजी घेऊन कडक नियमावलीचे पालन करते. रुग्ण व नातेवाईकांच्या संमतीनेच अवयव काढून गरजू रूग्णांना वेळेत अवयवाचे प्रत्यारोपन केले जाते. त्यासाठी डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन अवघड असे हे कार्य शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडावे लागते.
            अवयवदात्याचे अवयव काढल्यानंतर अतिशय आदरपूर्वक संबंधित शरीर त्यांच्या  नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात येते, अशी माहिती  डॉ. गजानन परळीकर यांनी यावेळी दिली. तसेच अवयवदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. संकल्प करावा, असेही डॉ. परळीकर म्हणाले. ज्येष्ठ, तरुण आणि चिमुकल्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी गणेशोत्सव काळातील “संवाद पर्व” या उपक्रमाच्या माध्यमातून शासनामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची, उपक्रमांची जनतेला माहिती व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली. 

प्रारंभी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन गणेश मंडळाचे खजीनदार प्रविण तट यांनी केले तर आभार श्री. राहुल चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास गणेश मंडळाचे कैलास पुरी, विश्वजीत म्हेत्रे, चेतन साळुंके, राजेश गायकवाड, अतुल शेरकर, सुनिल परसे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण-तरूणी, बालवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.